कविता लिहिते आहे
म्हणजे लिहायची आहे
पेन, वही घेतली आहे
पूर्ण एप्रिलभर लिहायची म्हणत्यात
NaPoWriMo की काय ते
रोज काय लिहिणार?
कागदावर ठसठशीत अक्षरात "कविता" लिहिलं
कविता नावाच्या मैत्रणीची आठवण आली
मग निवांत तिच्या सोबत गप्पा मारल्या
कोणे एके काळी शब्दांची कविता पण मैत्रीण होती
रुसलीय पण
रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू
कोपऱ्यात जळमटं दिसत आहेत
वाह!! जळमटांची काय कविता सुचलेली
झाडू काय, vacuum cleaner काय
काय ते वायरल की फंगल काय ती झाली
असोत, सध्या कोळी मारते
पुन्हा कागद
पुन्हा एप्रिल
पुन्हा कविता
विट आला डोक्यातल्या दगडांचा
कोणावर लिहू?
कशावर लिहू?
मुळात का लिहू?
तीस कविता तिशी ओल्यांडल्यावर कठीण पडतात
डोळ्यांवरचा गुलाबी चष्मा काळा काळा पडत जातो
सगळंच किती निरर्थक आहे समजून जातं
जगातल्या घडामोडी, देशातल्या निवडणुका
बातम्या जसजश्या पाहत जातो, कविता तसतशी मरत जाते
क वि ता
आता अक्षरं वेगळी करून सुद्धा लिहिली
पण दगड आपले एकमेकांनाच आपटत आहेत
भावना अक्षरात बदलायचा आत चिरडत आहेत
एप्रिलचं काय कौतुक?
फुलांचा महिना म्हणून असेल
हिंदीत बसंत ऋतू म्हणतात
बसंत वरून बसंती आठवली
कुत्र्यान समोर काचेवर नाचली ती
असोत
तश्या कविताही नाचतात
आणि उमलतात फुलांसारख्याच
निरनिराळ्या रंगांचा असतात
डोळे दिपवतात
मन शांत करतात
सुवासही देतात
आणि हळूच नकळत मनातल्या कविता कोमेजतात पण
फुलांवरून "fool" आठवलं "April fool"
म्हणजे ह्या महिन्यात कविता लिहून स्वतःचं स्वतःला मूर्ख बनवायचं
कारण आपण कविता तयार केली ही
समजूतचं मुळात मूर्खपणा
खरचं आपल्या कल्पना असतात की
आयुषभर वाचलेल्या, ऐकलेल्या?
त्यात उगीचं शब्दाला शब्द जुळवून
स्वतःचं तुणतुणे वाजवायचे
मला झेपेनासं झालय म्हणून बहुदा असले विचार
कोल्हा द्राक्ष आंबट वगैरे वगैरे
फ्रिज मध्ये द्राक्ष आहेत
द्राकशाची दारू बनते
पिचर मधले कवी सतत दारू पित असतात
कागद, पेन, ठळक अक्षरात "कविता"
तहान लागलीय
असोत
ही कविता झाली का ओ?!?!
Very innovative nice poem. I enjoyed
ReplyDeleteThank you :)
DeleteHaha hi Kavita zaalich khara! Mast
ReplyDeleteHahaha thanks :)
Delete