Saturday, 20 April 2019

दुपट्टा




Another interpretation of the same art

You can listen to it on
https://www.dropbox.com/s/6p2jwv0hzsc49x6/Dupatta.wav?dl=0

मऊ सूती कापड
गडद निळा, नाजूक बुट्टी
सुंदर कलमकारी दुपट्टा होता
निरखून तो पाहत होता
आरसे त्यावर निरनिराळ्या आकाराचे
वाढवत होते शोभा कापडाची
प्रतिबिंब दिसलं त्याला त्यात त्याचं
सावळा रंग, धारदार नाक, कडक मिशी
पण एक नाही, अनेक प्रतिबिंब
प्रत्येक आरश्यात निराळं
कशात दिसलं त्याचं बाह्य रूप
तर कशात त्याचं खरं रूप
सुंदरशी एक स्त्री, मोकळे केस, गुलाबी ओठ
पण बाजूच्याच प्रतिबिंबात
एक गोंडस मुलगा
त्या बाजूलाच एक अल्हड़ तरुणी
मध्येच एक स्वच्छंदी पक्षी
पुन्हा ती स्त्री
पुन्हा तो पुरुष
तो ती तो
प्रतिबिंबच प्रतिबिंब
जणू त्याच्या चैतन्याचे हजारों तुकडे
त्या ओढणीवर विखुरलेले
"बायकोसाठी घेताय का?"
प्रश्न पडला त्याच्या कानी
अचानक जाग आल्यागत
दचकून वर पाहिलं त्यांने
पराभूत स्मित देऊन म्हणाला,
"हो तिला खूप आवडेल, पॅक करा"...

No comments:

Post a Comment