"सरिता ओ सरिता!"
"काय ओ आजोबा?"
"ये ग छकुले, तुझी ओळख करून देतो"
"तर मंडळी ही माझी नात, तश्या बऱ्याच नाती आहेत मला, एकूणच आमचं कुटुंब मोठं,
म्हणजे तुम्हाला अंदाज यायला सांगतो पृथीवचा जवळपास ७० टक्के भाग आमचाच परिवार घेतो!
जरा अल्लड आणि फटकळचं आहेत कार्ट्या पण तितक्याच गोडही आहेत
तर आज हिची कथा ऐका”
“Hi Peeps, सॅम आजोला ना गोष्टींचा नादच आहे, आता मला पुढे केलय
श्या! छान प्लान होता बहिणींना भेटायचा
काय सांगू तुम्हाला मज्जा!
आम्ही एकत्र आलो ना की नुसता धुमाकूळ, अगदी एकमेकींत मिसळून जातो
परवा नाही का,आम्हा तिघींना भेट्लेलात?!?
फोटो क्लिक करून इन्स्टावर टाकलात #त्रिवेणीसंगम #savetherivers
आणि मग Laysची पाकिटं आमच्यात सोडून परतलात
नाही ओ, टोमणा नाही मारत आहे. आपलं अशीच आठवण सांगितली.
तर मी सरिता, you can call me “सरु”
माझा इंस्टाग्राम हॅन्डल आहे @gowiththeflow
So you know we can do #likeforlike
तसं offline तर तुम्ही मला खूप like करता
मी आणि माझ्या बहिणी जाऊ तिथे आमचा पिच्छा पुरवता
थेट हिमालयाचा आमच्या जन्मभूमी पासून ते आम्ही सॅम आजोंना भेटतो तिथवर.
आधी कसं आम्ही इथून पळ, तिथून वळ, रमतगमत असायचो
तर आजूबाजूला वृक्ष मामा भेटायचा त्याच्या अनेक अवतारात
लहान मुलं नाचल्यागत रंगीत फुलं माना डोलवायची
तुम्हाला नाही का रंगीत मोरांची हिरवी पैठणी मिरवायला आवडतेत,
तशीच आम्ही बहिणीपण आनंदाने रंगीत काठांचा हिरवा शालू नेसायचो
पण तुम्ही मात्र आमच्या साड्याच जाळ्यात....
आम्ही नित्यनियमाने तुमच्या गावागावात हिंडून छान गोड आणि गार पाणी पुरवतो
अगदी सॅम आजों एवढ्या उंच नाही
पण आमच्या शरीराला झेपेल तितक्या उड्या मारून तुमचं मनोरंजन करतो
तुमचे आजोबा पणजोबा आमच्या तिरी येऊन तासंतास बसत,
आमच्या उडण्याचा, पळण्याचा, संथ आवाज ऐकत विचार करत,
काव्य बनवत, परमेश्वराला शोदत्त
आमच्या संत चालण्याचा आवाज ऐकत अनेक संथ तयार झाले
पण आता मात्र Peeps you are getting on my nerves हां! #त्रस्त तटिनी
आधी काय तर मेल्या होड्या चालवायला लागलात माज्यावर,
तुमच्या अंगावरून गाड्या गेल्या तर चालेल का ओ तुम्हाला?
आणि उघड्यावर कपडे धुण्याचा,
अंघोळ करण्याचा, अगदी पॉटी करण्याचा कुठला शौक पाळलात?
सगळा मैला, साबणाचं पाणी आपलं मी निमूटपणे गिळायचं
त्यात आता तर माझा पिकनिक स्पॉटचं बनवलात तुम्ही
या ओ भेटायला, अगदी सहकुटुंब या,
गर्लफ्रेंडला आणा, स्वतःच्या बायकोला आणा,
अगदी दुसऱ्याचा बायकोला आणलत तरी चालेल (on your own risk)
मलाही तुमची संगत आवडेल, मी छान पोझेस पण देईन pics साठी
पण You know मला feed करण्याची काहीच गरज नाही
तुमची भेळ, चिप्स, प्लास्टिकचा बॅगा, सरबतं मला खरंच नकोत
Digestionचे issues होतात
I don't like to feel constipated okay
आणि काय ओ तुमचं Science कि काय ते इतकं प्रगत झालंय,
तर त्या फॅक्टर्यांमधनं येणारे घाण, विषारी द्रव्यं
त्याला जरा एखाद्या चांगल्या डॉक्टर ना दाखवा
काय ती ट्रीटमेंट वगैरे घेऊन मग येउदे माझ्या बरोबर खेळायला!
अच्छा anyway सॅम आजो बोंबा मारत आहेत माझ्या नावाने
कि जास्त complain करू नकोस
एक तर हल्ली तुम्ही जरा काही चूक काढली कि लगेच anti-nationalचा शिक्का लावता!
त्या वरून आठवलं, तुमच्या National Anthemमध्ये आमची नावं घेता ना,
हल्ली अगदी पिचर पाहायचा आधीदेखील
एका हातात popcorn आणि दुसऱ्यात समोसा धरून!
त्या Anthemची तरी लाज बाळगा,
अच्छा ते नाही तर खुदासे तो डरो!
खुदा म्हणजे जो कुठला देव तुम्ही मानता तो
त्यावरून don’t get started now!
आमच्यातच उड्या मारून पाप धुणार
आमची पूजा करणार
आम्हाला देवी म्हणार
आणि मग अनादर करणार
अहो उगाच नाही आम्हाला देवींचा दर्जा दिलाय
हसत खेळत, रमतगमत आमचे खेळ चालू असतात पण अडचणी काही कमी नाहीत
आम्ही मात्र सगळ्या अडचणींची मात करत आपला रस्ता स्वतः बनवत पुढे चालतो
एकमेकीं ना नावं न ठेवता, मत्सर न करता एकमेकींत विलीन होतो
गरज पडते तेव्हा
स्वतःच्या शरीराचे भाग करून
amoeba सारखे binary fission करून multiply होतो ( google करा )
कुठलाही अहंकार आणि मी पणा न ठेवता, आमचा "स्व" सॅम आज़ोना समर्पित करतो
तसे मला जरी ओरडलेत तरी ते सुद्धा चिडचिड करतात बरं का तुमच्या बदल
मी तरी सरळ तोंडाने सांगतेय (आढेवेढे घेणे माझा स्वभाव असून सुद्धा)
Ajo's temper, you have no idea!
एकदा का त्यांचा राग लिमिट बाहेर गेला कि
"आता माझी सटकली" म्हणून जोरजोरात उड्या मारू लागतील
आणि मग काय त्यांना थांबवणं नाही!
काय म्हणालात? धमकी देतेय का?
पहा, धमकी म्हणा, वॉर्निंग म्हणा, किंवा helpful advice पण एकूण
सुधारण्यात तुमचंच भलं आहे
नाही तर काय Blue hai paani paani गात बसाल
आणि एक तर पाणी प्यायचे वांदे होतील नाहीतर सगळेच आजोंखाली बुडून जाल"
#bewarned #saritarocks #samsanger #saynotoplastic #savetherivers
No comments:
Post a Comment