Monday, 22 April 2019

टोपीवाला पोपट



 Based on the above picture by Shweta Ektare and Bullock Cart Poetry

Listen to the audio on

https://www.dropbox.com/s/u8fdc9wawmeq5kr/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9F.wav?dl=0

पाहताच क्षणी ह्या चित्राला
एक गंमतीशीर बालगीत आठवलं
"शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा,
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला
मित्रांनो देवाघरची लूट देवाघरची लूट
तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय?"

तसं बालगीत आणि नेत्यांच्या भाषणात
नाही फार फरक
पुन्हा पुन्हा तेच बोलायचं
यमक जुळवत राहायचं
तसही देशाच्या प्रगती पेक्षा
नारेबाजी महत्वाची
तर....

खुर्चीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला
मित्रों, जनतेकडली लूट, जनतेकडली लूट
तुम्हा आम्हा सर्वांना आहे सब छूट
एक एक मंत्रिपद प्रत्येकी
ह्या सत्तेचे कराल काय?

साठ वर्षे सत्ता धरून
केला कोणी भ्रष्टाचार
तर अच्छे दिनचा वायदा करून
केला कोणी धार्मिक हटवाद
आता काय तर
कोणी करतंय सगळ्यांचा विकास
तर कोणी करतंय न्याय
शेवटी सगळा डोंबाऱ्याचा खेळ
एकाच माळेचे मणी सगळे
लालची,भ्रष्ट, खुनी, गूंड, गुन्हेगार
आहेत पाळले सगळ्यांनीच
कापडं कोणाची हिरवी, कोणाची भगवी तर कोणाची निळी
चारित्र्य मात्र सगळ्यांचचं काळं
प्रचार, व्यभिचार, भ्रष्टाचार
किती साम्य आहे ना ह्या शब्दांत?!?!
जवळ जवळ सारखेच उच्चार

"पोपट म्हणाला
छान छान छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
आपुल्या शेपटाचा उपयोग करा...
नाहीतर काय होइल?
नाहीतर काय होइल?
दोन पायाच्या माणसागत आपलं शेपुट झडुन जाईल.."

सत्तेच्या देणगीचा ठेवा मान
आपल्या मंत्रिपदाचा उपयोग करा
नाहीतर काय होइल?
नाहीतर काय होइल?
काय होणार आहे
पाच वर्षांनी विरोधी पक्ष निवडून येईल!

पण माझी पोपटपंची राहुद्या बाजूला
शेपूट नसलेले प्राणी आपण
पण उत्क्रांती मुळे मेंदू नक्कीच विकसित आहे
मग वाचवूया आपलं जंगल
इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती
पण मार्ग तर शोधायलाचं हवा
चला माहिती करून घेऊया-
उमेदवारांची
पक्षांच्या जाहिरनाम्यांची
शिक्षण, शेती, संरक्षण, रोजगारी
ह्यावर कोणी किती काम केले ह्याची
सशक्त, जाणकार मतदार बनुया
चला मतदान करूया...

आणि हो, NOTA दाबून मत्त फुकट घालवू नका
नाही तर असं व्हायचं की
तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले!







No comments:

Post a Comment