Tuesday, 16 April 2019

निवडणुकिंचा भोंगा



Another interpretation of this amazing artwork by Shweta Ektare 

संगीत, निसर्ग, कला
चित्रात दिसूनबी दिसेनासं झालय
निवडणुकींचा चष्मा लागलाय डोळा
फकस्त भोंगा दिसू लागलाय मला
रेकॉर्ड गत गोलगोल पिस्तेय जनता पहा
प्रचारांचा भोंगा फाडतोय गळा
किती किती आणि काय काय ते वायदे पहा
चित्रातल्या भोंग्यातून वाढत्यात फुलांच्या वेली
तर, आश्वासनांच्या वेली उंच वाढत्यात 
निवडणुकींच्या भोंग्यातून
सत्ताधारी पक्ष कांगावा कर्त्यात
तर विरोधी पक्ष आपसातचं लढत्यात
महागटबंधन किंचाळत्यात खरं
पण चित्रातल्या पाखरांवानी एगएगल्या दिशेंना तोंडं कर्त्यात
ह्यो ग्रामोफोनच्या भोंग्यातून यायची थोरांची गाणी 
निवडणुकीच्या भोंग्यातून येणाऱ्या विषाने
मात्र ऐकू येतो फकस्त आक्रोश आपल्या मायभूमीचा

No comments:

Post a Comment