The theme for Earth Day 2019 is
'Protect Our Species'. You can read about it on https://www.earthday.org/campaigns/endangered-species/earthday2019/
Also don't forget to see today's Google doodle.
Here is a miniscule contribution from my end
Listen to it on
चक्कर येईस्तोवर गोलगोल फिरून
दिवस रात्र तुम्हाला देते मी
तुम्ही मात्र एक दिवस धरून
होता मोकळे मला साजरी करून
घोषणा काय, सभा काय
चित्र, चित्रपटं, कविता काय
आणि नंतर ये रे माझ्या मागल्या!
एक दिवस तरी येते माझी कीव तुम्हाला
हे ही माझं भाग्याचं म्हणायचं
पण फक्त प्रचाराने काय तुम्ही तरणार
अमंलबजावणी कोण तुमचा काका करणार!
"सर्वात हुशार लेकरं माझी,
असेनात का थोडी स्वार्थी"
असं स्वतःला समजावून दमले मी
आडनाव नाही मेल्यानो माझं दामले
मी म्हणतेय सहनशीलतेचा झालाय माझ्या अंत
त्रास देताय तुम्ही मला अत्यंत
माझचं चुकलं लाडावून ठेवलं तुम्हाला
वेळेतचं कान हवा होता पिळायला
माझ्याचं उदरातून आलात सगळे
पण कितीतरी बाळांचा माझ्या केला नाश तुम्ही
पापाची फळं भोगावी लागतील ह्याच जन्मी
वय झालयं आता माझं
शिस्तीत लागा वागायला
होतोय त्रास माझ्या लेकरांना इतर
कारण तुमचं वाढतंय लिट्टर
पुरे झाली तुमची थेरं
नाही तर शिव्या घालतील तुम्हाला तुमचीचं पोरं!
No comments:
Post a Comment