Listen to the audio on
https://www.dropbox.com/s/e6bld912ohpi8bm/Amchi%20surili%20katha3.wav?dl=0
for a better effect
मागे एकदा आई, मम्मा आणि काकूंने माझ्या किचनचा ताबा घेतलेला
सणासुदीला असं होतंच, सगळ्यांची लुडबुड त्यातचं खरी गम्मत
तर आई म्हणजे सासूबाई,
मम्मा म्हणजे माझी आई आणि काकू
म्हणजे नवऱ्याची काकू जी वाटते आईच
"अहो कशाला मी करते", असं
बोलत होते खरी
पण मनात अगदी हूश्श्श्श वाटत होतं
माझ्या काहीश्या अव्यवस्थित किचनमध्ये बिचाऱ्या गूळ शोध, डाव शोध करत होत्या
तर अशी ट्रेजर हंटची मज्जा घेत घेत जोरदार स्वयंपाक चालला होता
मी गुणीपणाचा आव आणून अधनंमधनं
डोकावत होतेच
"ह्या सुरीला धाराचं नाही, साधी काकडी कापायला इतका जोर लागतोय"
हे अर्थात आमच्या मातोश्रींकडून, कारण सासरच्यांसमोर पण मुलीला लायकी
दाखवायलाचं हवी
हे बहुदा गरोदर असतानाच्या रूल बुक मध्ये शिकवत असतील
हळूच त्या तक्रारीला दुजोरा दिला गेला
त्रिकुट अगदी संयुक्त होतं
मम्मानेच दिलेल्या सुर्यांचा सेट
एक सोडून चांगल्या सहा सुर्या होत्या
पण त्रिकुटाच्या "धारदार" च्या डेफिनिशन मध्ये एकही बसत नव्हती
त्यात नवरा म्हणतो "माझ्या सेफ्टीसाठी नवीन घेत नाही आहोत, हा हा ह"
मी झटदिशी त्याला आठवण केली "आपल्याकडे कोयता पण आहे! "
ह्यावर बाकी दोघी हसल्या, मम्मा मात्र डोळे वटारून पाहत होती
लाडक्या जावयाला धमकी दिल्याबद्दल
असोत, तर मुद्दा हा
की, काय बरं मुद्दा होता?
हां, "सुरीला धार नाही" हे अगदी, "चुकीला
माफी नाही ", च्या टोनमध्ये मातोश्री म्हणत होत्या
मी आपलं लगेच यमक जुळवायला लागले,
"सुरीला
माझ्या धार नाही,
कापले फार जात नाही,
आरपार सुरी जात नाही,
तुमच्या सुर्यांच्या ऑन पार नाही!"
पुढे आवाज आला,
"आपल्या
घरात बार नाही,
आपल्या किचनला दार नाही,
बायकोचं डोकं गार नाही,
तिची कधी होते हार नाही,
तुम्ही लहानपणी दिला तिला मार नाही,
दातांना लावली तिच्या तार नाही,
कुठलेच पाळत आम्ही वार नाही
क्विड सारखी दुसरी कुठली कार नाही!"
हे अतिशय अर्थपूर्ण शहाणपणाचे मोती नवरोबाच्या तोंडून पडले होते
आमचं काव्य ऐकून
तीन बायका तीन सुऱ्या घेऊन समोर उभ्या होत्या
अर्थात, त्यांना धार नसल्याने आम्ही सेफ होतो
त्रिकुटाच्या
त्या विझिट नंतर लगेच धारदार सुरी घेतली
दुकानातल्या दिव्याखाली चकाकत होती
मी मुठीत घेऊन तिला निरखून पाहत होते
बाजूला पहिलं तर नवऱ्याला घाम
फुटलेला
पण मी त्रिकुटाच्या शब्दाबाहेर
नव्हते
आणली सुरी विथ धार
इन आवर किचन विथ नो दार
तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे
पांढराशुभ्र कटिंग बोर्ड लाल झालाय
फूड कलरिंग टाकल्यागत लाल अन्न जेवतोय
लवकरचं आम्ही वामपायर होणार आहोत
हाताच्या नशिबाच्या रेखांची रडून रडून राखी झालीय
शेजारच्या मेडिकलवाल्याने बँडएड्स विकून विकून बंगला बांधलाय
नाव ठेवलंय "सुरीकृपा"
घाम जाऊन जाऊन नवरा डिहाइड्रेट झालाय
"धारदार
सुरी वापरायचं आपलं काम नाही
एप्रिल आला पण अजून खाल्ला
आम्ही आम नाही
पंखा लावलाकी येतो घाम नाही
ब्रेडला लावत आम्ही जॅम नाही
जगात आज कोणी उरला
राम नाही
धारदार सुरीचं परत काढणार नाम नाही!"
हा कोरस होता
असोत, कीबोर्डवर सांडलेलं रक्त पुसून घेते.....