Friday, 15 November 2019

म"हास्य"राष्ट्र



राज्याचे वाजले आहेत बारा
घडाळ्याचे काटे फिरतं आहेत भराभरा
होतं आहे बाणांचा मारा
हात जिता जरी तो हारा
अश्रूंने झाला तलाव खारा
कमळाचा चढला पारा
नाही येऊ शकला तो दोबारा
सत्तेचा वाहतो आहे वारा
आमदार अंडर पहारा
झोलचं आहे सारा
राज्याला नाही कोणाचाचं सहारा...

Thursday, 14 November 2019

The Real Mr. India.


As we celebrate Children's day today, I was reminded of one of our desi superheroes Mr. India. The protagonist of the film Arun Verma lives with and takes care of orphaned children. A futuristic watch helps him become invisible and thus invincible. He goes on to fight crime as Mr. India taking on the iconic villian Mogambo.
Coming to the real from the reel, I was fortunate to meet a real Mr.India. He does not have a magic watch or the power of invisibility but instead he has the magic of courage and selflessness. As for invisibility he needs the polar opposite of that; to be visible to as many as possible. Without further ado, let me introduce you to Mr. Ashok Deshmane. He is the founder of the non profit organization- Snehwan- A ray of Hope. Snehwan takes care of about 80 children mainly belonging to drought-hit farmer families.
Born and raised in Parbhani, in a farmer's family himself, Mr.Deshmane had faced firsthand the struggles of basic necessities and especially education. Overcoming all odds he completed his Masters in Computer Science and was working in a known software company in Pune. Like lakhs of us, Deshmane could have built his savings, gotten himself a swanky car, a comfortable home and secured his and his family's future. But he did not forget his roots and taking inspiration from Swami Vivekanda, Baba Amte, he chose to make the future of impoverished children instead of his own. He quit his job and started Snehwan for the children of drought affected farmers.
I had the fortune of visiting his earlier home at Bhosari, Pune alongwith my friends who celebrated their son's birthday with the boys at Snehwan. In that small yet neat and comfortable abode Deshmane and his extended family lived more happily than a king in his palace. This was because Deshmane, his wife Archana and his parents look after these boys as their own children, showering them with the same affection as one would do to one's own flesh and blood.
Despite the space crunch Deshmane had an extensive library and even computers for his kids. Fortunately, in 2018 a substantial area of land was donated to the organisation and presently they have a much larger abode at Koyali phata (details below).
We recently visited the new place with our friends who had arranged for Diwali faral for the children. This new home is equipped with a state of the art computer centre, floor to ceiling book shelves lining several walls, bunk beds for the kids and much more. Nutritious food is prepared by his mother and wife Archana who is a mother to all the children at Snehwan. The boys enthusiastically showed us around the place, with a mixture of pride and gratitude in their eyes. Deshmane emphasizes on overall development of the children so on one hand as they become technology savvy, on the other hand they also learn composting, dairy business, fertilizer manufacturing at the Goushala. They are also taught practical skills like stitching, making cards, rakhis etc. The kids practise yoga every morning and evening and are also given responsibilities around the house to build their organisational skills, confidence, interpersonal skills and such. Deshmane's father himself teaches them tabla and folk songs.

The vibe of the place is such that it cannot be expressed in words but has to be felt. Mr. Ashok Deshmane has won several awards and recognitions for his work. His story has been told by recognised national and international platforms. He is also grateful to the people who have contributed to his work one way or the other. But taking care of the needs of 80 children is not a small task. Any and every kind of help contributes towards the future of these children. You may donate through CSR activities at your work place or personally, also by giving required supplies like stationery, blankets etc. In Mr. Deshmane's opinion, the gift of your time is the most valuable. You can volunteer to teach them any skills, sports, arts, languages, learnings which we take for granted but are valuable to these children.
Let's give our Mr. India a helping hand as he fights the Mogambo of illiteracy.


*Snehwan*
Koyali Phata, Alandi-Wadgaon Road, Near Koyali forest, Koyali Tarfe Chakan,
Pune 410501
Contact- Ashok Deshmane
+91 8796400484/ 8237277615
Email- snehwan@yahoo.in
Snehwan- A Ray of Hope
Bank details- SBI
Account name- Snehwan Branch- Pimpri town
Account number- 35517151681
IFSC Code- SBIN0005923
*Note*- Donations to Snehwan are eligible for benefits U/S 80G of Income Tax Act, 1961.
- Sneha Karle
Moshi, Pune.

Must read and share




Tuesday, 9 July 2019

Rain, fart filters and a love story










Come monsoon like every other typical couple we head out to drown. Well, in Bombay the word "drown" can be used in the literal sense but thankfully here at the end of the Earth meaning Moshi I use drown in a more ornamental sense. Drown in the greenery, the black clouds, petrichor, cool breeze, blah blah blah you get the point..

So we head out exerting our kWid along narrow paths, some riverside, and some uphill. This obviously is followed by clicking a thousand snaps, then remembering the phone is too expensive so stuffing it in the glove box and then getting drenched to our hearts' content. Now, here comes my problem. The world gets blurred because the damn spectacles have myriad tiny rivulets flowing on it. If I remove them, the world becomes blurrier and I can't keep wiping the lenses with my already wet clothes.


While this is happening almost every time I tell Adi, "My goddamn glasses need wipers!" Why has no one come up with this?!? There are thousands of weird useless products out there. While browsing once, I happened to come across a "fart filter" which absorbs the smell of farts before it escapes from its closed confines, no kidding! If there are fart filters in this world then I demand spectacles wipers! They can be really tiny and hide in the frame, coming out to do their thing with a click of a small switch (also hidden). This is not exactly beyond the realms of reality! 


With this thought in place I kind of got obsessed about the wiper and kept observing it as it oscillated hypnotizing me. The windshield is chilling, minding its own business, getting a shower, flirting with the raindrops as they slide seductively on it making it all "wet" when out of nowhere like the dad of the girl you are fooling around with, comes the mighty wiper and breaks up the coupling with a swipe. Fresh kisses are showered on the windshield and it gives an arrogant smirk before getting swipe slapped again and then again and some more. The damn guy can't complete a kiss! All that it gets is his lover's memories scattered all across it, her fragrance enveloping it completely. 


I am shaken out of my reverie with a painful crick in my neck, which has been moving along with the wiper. As I drift off to sleep with the rain lullaby, one thought lingers in my mind,
 "wish life had a wiper". 






Friday, 28 June 2019

66



Listen to it on 66

साधारण सहावीत असल्यापासून, "आम्ही आता मोठे झालो, स्कूल बसने नाही जाणार" हा हट्ट मी आणि माझी बहीण करू लागलो. आता ओला, उबेर आपल्याला दारापाशी यायला हवी असते पण शाळेच्या बसच्या त्या फायद्यापेक्षा 'आम्ही आता लहान नाही' हे सिद्ध करणं जास्त महत्वाचं होतं. पंचविशी ओलांडल्यावर त्याच पालकांना 'आम्ही अजून लहान आहोत' हे सिद्ध करायला लागलो!

तर आमची कटकट ऐकून सातवी पासून BEST ने जायची परवानगी मिळाली. बस स्टॉपला पोचायलाच पंधरा मिनटं चालावं लागायचं पण मनात थोडीशी भीती, थोडासा उत्साह ह्याची वेगळीचं गम्मत होती.

"इतका काही उशीर नाही झालाय आपल्याला"
"ही बस जाऊदे ह्यात खूप गर्दी आहे"
उगीच एकमेकाला कारणं द्यायची.
खरं कारण एकचं- डबल डेकर पकडणे!
त्याची उत्कंठा काही निराळीच होती

एका बस वर दुसरी बस!
किती राजेशाही वाटायची ती बस, एखाद्या परिकथेतून आल्यासारखी. राजकन्येला घ्यायला जसा तिचा रथ येतो तशीच ही भव्य जादुई गाडी आपल्यासाठी खास येत आहे असं वाटायचं. कदाचित हे इतकं इतरांना नसेल वाटत पण मी बाहेरच्या जगापेक्षा मनातल्या जगातचं असायचे त्यामुळे सगळंच जादुई वाटायचं.

धक्काधक्की करून आत शिरतांना मात्र परिकथेतून बाहेर यावचं लागायचं. आणि ह्यात फक्त बसमध्ये शिरणं नसून वरच्या मजल्यावर पोचायचा ध्येय. भव्य बंगला आणि घराच्या आतून वरच्या मजल्यावर जायला जिना हे फक्त चित्रपटानंमध्येच दिसायचं. त्यामुळे डबलडेकरच्या जिन्याचं कौतुक वाटे. त्यात हलणाऱ्या बसमध्ये तो अरुंद जिना चढायची थ्रिल!

खालच्यापेक्षा वरच्या मजल्यावर गर्दी जास्त असायची आणि त्यात नव्वद टक्के शाळेचीच मुलं. पण त्या चेंगराचेंगरीतसुद्धा जरा खिडकीतून डोकावता आलं की आपण उडत आहोत असं वाटायचं! विमान प्रवास फक्त पु.लं च्या अपूर्वाई मध्ये अप्रुपाने वाचलेला. त्यामुळे कदाचित डबलडेकरचं अप्रुप जास्तं. आजूबाजूचांच्या चेहऱ्यावर पण तोच उत्साह असायचा. साधारण सगळेच मध्यम वर्गीय कुटुंबातले विद्यार्थी असल्याने आमच्या एकक्तरीत  कल्पनाशक्तीने बसच्या त्या वरच्या मजल्याचं विमानात रूपांतर व्हायचं!

काही आकडे मनात कोरले जातात. सायनहुन दादरला 66 नंबरची डबल डेकर जायची. आता ज्या आतुरतेनं विकेंडची वाट पाहतो त्याचं आतुरतेनं सहासष्ट ( आताच्या सपोसेडली   स्लो मुलांसाठी- "साठ सहा") नंबरच्या बसची वाट पाहायचो.

कधीतरी धकाबुकीत यशस्वी होऊन पुढे जायला मिळायचं. डबल डेकरची ती पुढची खिडकी म्हणजे जणू स्वर्गचं! बसायला मिळणं अशक्य पण उभ्याउभ्या का होईना त्यातून डोकवायचं. घामटलेल्या चेहऱ्यावर वारा गुदगुल्या करायचा.
आता ऍडवेंचर स्पोर्ट्स मध्ये पण त्या खिडकीतून डोकावल्याचा थ्रिल येणार नाही. त्यात सुट्टीच्या दिवशी फिरायला गेलं तर त्या पुढल्या सीटवर बसायलासुद्धा मिळायचं! त्या सीटवर बसून त्या छोटेखानी खिडकीतून डोकावताना सम्राट असल्यागत वाटायचं! सर्व जग खाली आणि आपण वर. प्रवास संपूच नये असं वाटायचं. आयुष्यात बहुदा तेव्हाच मुक्कामी पोहचायची घाई नसून प्रवासाचा आनंद घेता आला.

आता डबल डेकर पण कमी झाल्या आणि छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद देखील. मागच्या वेळीस पुणे-मुंबई प्रवासात ही बालपणीची जादुई बस दिसली आणि एखादा चित्रपट पाहिल्यागत भराभर आठवणी डोळ्यांसमोरून गेल्या. फोटो काढायला म्हणून खिडकी खाली केली, पावसाचे थेंब चेहऱ्यावर पडले, वाऱ्याने गुदगुल्या केल्या, अगदी हाडांपर्यंत शांत वाटलं.

कदाचित फक्त खिडक्या खाली करण्याची गरज आहे. कुठेतरी आपल्यात अजूनही ती निरागसता शिल्लक आहे. मनाच्या काचा पुसूया
खिडक्या उघडूया
मनातल्या मनात का होईना, डबल डेकरच्या वरच्या मजल्याच्या पुढच्या सीट वर जाऊन बसूया, प्रवासाचा आनंद घेऊया......

Monday, 17 June 2019







Darkness crept on us suddenly
On a bright sunny afternoon
The sun fought hard 
Not ready to back down easily
But they ganged up on him
Royally black and majestic 
One couldn't help cheering for them
The mountains though are 
closer to the sun
After all they tuck him in after a hard day's job
Not impressed with the black royalty 
The mountains pierced at their very hearts
They bled all over us
Their anguish making the blood look like tears







Wednesday, 12 June 2019





Twinkling lights row in row,
make the twinkles above hide
The lady in white though stands her ground,
graceful curves
angelic glow
she rules the darkness
One form she keeps not
a queen has to change with the times
Revealing her full glory once in a while
also knowing when to hide
She rules the oceans
makes them jump to her command
She rules the verse
in lovers' hearts
She gives hope of a new world
not yet invaded
by twinkling lights row in row

Monday, 10 June 2019

The Petrified Elephant




Wings,
as beautiful as they can be.
Looking like they are ready
to cut across clouds,
to race the wind.
Potential,
Blessings,
Abilities,
the world sees in them.
But stuck they are
in time
in fear
in doubt
No memories of flying
flapping even.
Their fears petrify them
so much so
that they themselves are petrified now.
Weight of their failure
crushing dreams
before they are fully formed....

Tuesday, 4 June 2019

भातुकली





You can listen to it here-
भातुकली


भातुकली

घर घर खेळण्यात, येई खूप गंमत
सोनेरी ते दिवस, मोजावी नाही लागायची कसलीच किंमत

चटईचे असे घर चिमुकले
Property rate, EMI चे भूत तोवर मानेवर नव्हते बसले
तेवढूश्या जागेत पण बसे
Hall, bedroom, kitchen
मन तेव्हा सांगत नसे 'तू दिखावा कर'

बडीशेप आणि साखर बने
भात, डाळ, भाजी
'बडीशेप नक्की संपते कशी' विचार करे आज्जी
गूळ, चिंच, बर्फ चोरता आलं तर असे मेजवानी
मग चोरणारी बने त्या दिवशीची राणी!




छोट्याश्या कुकर मध्ये साखरेचे दाणे चार,
दोन थेंब पाणी त्यात
आणि आई बोट बुडवून माप घेते
ती नक्कल करून शिट्ट्या वाजवायच्या जोरदार!
गुळाचा तुकडा सापडला की पोळपाटावर त्याला करायचा चपट आणि आजचं होळी समजून खायची पुरणपोळी!

इवलीशी शेगडी, इवलीशी भांडी,
पितळेची घागर आणि मातीची हंडी
पिटुकल्याश्या वाटीत हळदीचं पाणी बने आमरस
आणि कागदाचे तुकडे कढईत तळुन तयार पुऱ्या!
तेल, काडेपेट्या मात्र वरच्या फळीवर विराजमान
न लागू द्यायला आमच्या हाती
नाही तर चटईच्या घरा सोबत खरं घर पण
जळायची आई बाबांना भीती!

बार्बीचं लग्न लावायचं हि-मानशी
'इतक्या लोकांचा स्वयंपाक कसा करणार?'
म्हणून त्यांच्या रिसेपशनला फक्त टी!
चिमुकल्याश्या कप मधून खोटाखोटा चहा बशीत ओतायचा आणि भुरके मारण्याचा आवाज करत
"वाह! किती छान"
अशी आपलीच आपल्याला शाबासकी द्यायची!



एकूण घाई मोठं होण्याची,
'एकदा का मोठे झालो की मनात येईल ते करायचं,
हवं तसं खायचं, पाहिजे तेव्हा झोपायचं,
अभ्यास, परीक्षा काहीच नाही,
मस्त मज्जा करत जगायचं!'
 वीस एक वर्षे भविष्यात डोकावून पाहता आलं असतं
 तर म्हणालो असतो
 "नको ते मोठं होणं,
 भातुकलीचं आपली बरी
 लग्नाची कशाला घाई?
 हवी जवळ आई!"

घर-घर खेळता खेळता मोठे कधी झालो समजलचं नाही
मोठाली भांडी, मोठाला कुकर,
मोठी ती शेगडी आणि मोठं ते घर
Sundrop oil ची जुनी आड आठवते?
ज्यात मुलगा लहान आणि सर्व जिन्नस मोठे होते
तसचं सौंसारच्या सुरवातीला,
आपण पिटुकलेच पण बाकी सगळं मोठं असं वाटायचं

भातुकलीचा खेळ सोडायला मन कधीच तयार नसते
खऱ्या कूकरच्या खऱ्या शिट्टया,
खऱ्या पुऱ्या आणि हळद नसलेला आमरस
बडीशेपचा तो भात आणि बडीशेपची ती आमटी,
मात नाही करू शकणार त्यांची
पंचपक्वान्नांची थाळी कुठची
अश्या ह्या बालपणीच्या गंमतीजमती

जाता जाता छोटासा देते एक सल्ला
अगदी भातुकली एवढा
'जग फार बदललं आहे,
खेळही बदलायला हवा
मुलींसोबत मुलांनाही घर-घर खेळायला लावा'



Tuesday, 28 May 2019

कान




You may listen to it here कान (pun intended)

दुःख
कोणालाच नको असतं,
भोगायला
पण सर्वांनाच हवं असतं,
दाखवायला
आधी वाटायचं दिखावा म्हणजे,
"पहा मी किती खुश आहे" दाखवणं
पण हल्ली जाणवायला लागलय,
दिखावा तर दुःखाचा होत आहे!
"माझा भार मोठा की तुझा?"
"तुला नाही समजायचं मी काय भोगतोय"
"काय सांगू, माझं नशीबाचं खोटं"
"आम्हाला कोणीच समजून घेत नाही"
"तुमचं काय बाबा, सगळं छान चाललंय"

उगाच मान हलवू नका, मी करते, तुम्हीही करता....

पण का आपल्याला आपलंच दुःख मोठं वाटतं?
का आपण दुःखाची पण स्पर्धा लावतो?
एखाद्याला सांगावी काही व्यथा,
तर तो सांगू लागतो आपलीच दुःखद कथा
मन मोकळं करायला कान आता उरलेच नाहीत
कारण ऐकायचं कोणालाच नसतं,
फक्त स्वतःचं रडगाणं गायचं असतं

आपल्या कडून कोणी अपेक्षा करू नये,
म्हणून ही रडारड का?
की कुठेतरी आपलं अपयश लपवण्याची पळवाट?
की इतकी संकटं असून पण,
"पहा आम्ही कशी मात करतो" ह्याचा पुरावा?
कदाचित प्रत्येकाची कारणं वेगळी असतील
आपणचं आपली कोळीष्टक विणतो
आणि अडकतो त्या जाळ्यात!
स्वतःत इतके गुंततो,
की तडफडणारा दुसरा कोणी दिसेनासास होतो
आणि हो कोणाचीच व्यथा खोटी नसते बरं का?!?
किंबहुना त्याला ती खरीचं वाटत असते
आणि तिची तीव्रता सांगणार्याला खूप आणि
ऐकणार्याला कमीचं वाटत असते
कारण ऐकणारा आपल्याच दुःखांची तीव्रता किती आहे
ह्याचा हिशोब करत असतो

कधीतरी
करू या का प्रयत्न,
स्पर्धा न लावता,
हिशोब थांबवून,
फक्त ऐकण्याचा?
नाही तर खांदा देताना खंत होईल
की आधीच कान द्यायला हवा होता......






Thursday, 16 May 2019

किशोरीताई, लेडी पु.लं व पॅनोरमा काका







रविवारची रमणीय संध्याकाळ, मी व माझा नवरा उर्फ “टकलू काका ”उर्फ “ड्रायवर” ज्याला कधीकधी “आदित्य” असही म्हटलं जात, फेरफटका मारायला निघालो.अर्थात चालत नाही! गाडीचे हफ्ते भरतोय म्हंटल्यावर वापर केलाचं पाहिजे! आम्ही मोशी ह्या अतिशय पावन ठिकाणी राहतो, एका बाजूला देहू तर दुसऱ्या बाजूला आळंदी. शहरापासून लांब असल्यामुळे आम्ही "कंट्रीसाईड्ला" राहतो असं कॉलर टाईट करून सांगतो. तर गेल्या रविवारी देहूला जाऊन पोहोचलो. तिथलं भंडारा डोंगर हे आमचं आवडीचं ठिकाण. तुकाराम महाराजांने त्यांचे अभंग ह्याच ठिकाणी लिहिले असे म्हणतात.  तिथे गेलं की असं वाटतं जणू अक्ख शहर आपल्या पायाशी आहे आणि आपण त्यावरून मुक्तपणे उडत आहोत.

छान वारा सुटला होता,अगदी सुरात होता, वरच्या मंदिरातल्या अभंगांचे स्वर पण त्यात एकजीव झालेले.
अल्लड वारा माझ्या लाल कुरळ्या बटांशी पकडापकडी खेळतं होता, तर आदिच्या चकचकीत टकला सोबत घसरगुंडी. सूर्यास्ताची वेळ होती, त्यामुळे नेहमी प्रमाणे माझं फोटो काढणं चालू होतं. नवऱ्याच्या नावाचा अर्थ सूर्य त्यामुळे आदि प्रमाणे तो सूर्यही मला सहन करतो. वॅनिला मिल्कशेक वर नारंगी बर्फाचा गोळा ठेवला की तो कसा हळू हळू वितळेल, मग बुडून जाईल आपलं “स्व” अर्पित करत आणि पांढऱ्या पेयाला नारंगी करेल, तसेच काहीसे सूर्याचे चालले होते. हो सहजासहजी मला खाण्याच्याचं उपमा सुचतात. त्यात सूर्याला बर्फाचा गोळा म्हणणारी खादाड ह्या जगात मी एकमेवचं असेन!असोत,तर एकूण सेटिंग तुम्हाला समजलं असेल, मग लेखाचं जे शीर्षक आहे त्या कडे वळूयात.







एक जवळपास साठीचं जोडपं तिथे आले. गाडीतून उतरताचं काका आपल्या मोबाईल वर तर काकू त्यांच्या मोबाईल वर फोटो काढायला लागले. पाच एक मिनिटांने मी हाक मारली, म्हटलं "काका, हल्ली आपण सगळे असेचं झालो आहोत ना? आठवणी तयार होतील ज्यांच्याकडे पाहून भविष्यात आनंद घेता येईल ह्या विचाराने फोटो काढत सुटतो. पण वर्तमानात त्याचा उपभोग घेणं बाजूलाच राहून जातं."काकांने मान हलवून म्हटलं " हा बघ पॅनोरमा, सॉलिड आला आहे ना?!?" पुढे काकू म्हणाल्या "मागच्या वर्षी युरोपला जाऊन आलो तेव्हा आम्ही सात हजाराचे फोटो प्रिंट केले अल्बम बनवायला" आम्ही लग्नाचा देखील अल्बम बनवलेला नाही हे ऐकून काकांने चमत्कारिक नजरेने आमच्याकडे पाहिलं. वयाची साठी ओलांडलेलं जोडपं पण तरी देखील पुढल्या प्रवासासाठी आठवणी जमवत होते. म्हणजे फोटो काढणे बरोबर की चूक? त्या क्षणाची मज्जा घेत काही आठवणी पण बनवणं असं संतुलन साधायला हवं. तसं संतुलन ह्या संकल्पनेचं आणि माझं फारसं जमत नाही! काही वेळाने पॅनोरमा काका काकू मंदिराच्या दिशेने गेले.


आठवणी तयार करणं, फोटो काढायची हौस आणि सोशल मीडिया वर मिळणारं वालीडेशन हे तीन हेतू पूर्ण होण्याइतपत फोटो काढून झालेले. मग स्वतःचाचं सल्ला घेऊन मोबाईल खिशात ठेवला आणि हलका नारंगी झालेला व्हॅनिला मिल्कशेक पाहत बसले. मस्त गप्पा झाल्या, ध्यान झालं, डासांचं पोट भरून झालं. अंधार पडल्यावर खालचं शहर आणि ताऱ्यांने चमकणारे आसमंत सारखेच दिसत होते. पण अंधार पडला की मला संगीत वाटणारं पक्षांचं गाणं, वाऱ्याचा आवाज, रातकिडे हे सगळे भूत पिशाच्यांचे आवाज वाटू लागतात, त्यामुळे चुपचाप परतीला लागलो.






किशोरीताईंची गाणी ऐकत छान ड्राईव्ह चालला होता. त्यात आम्ही दोघे गाऊन "अवघा रंग एक झाला" चे रंग उडवत होतो. किशोरीताई असत्या तर आमचं गाणं ऐकून त्यांना धडकी भरली असती! तेव्हड्यात मला तीन बायका दिसल्या. जरा ढाकचिक ढिंचॅक साड्या नेसलेल्या त्यामुळे अंधारात पण चमकत होत्या. चाकण MIDC त्यात रविवारची रात्र त्यामुळे सगळं सामसूम होतं. एकदम भयकथेची सुरवात वाटतेय ना? पण तसं काही नव्हतं. अर्थात मी फट्टू असल्यामुळे एक क्षण घाबरलेच होते. पण आदीने मात्र गाडी थांबवून त्यांना हात केला. येऊन एकीने विचारलं "रस्ता चुकला आहात का? कुठे जायचय?" मी म्हटलं "नाही ओ आम्ही इथे जवळचं राहतो, तुमच्यासाठी गाडी थांबवली. तुम्हाला कुठे जायचय?" एक दहा ते वीस सेकंद ती बाई फक्त माझ्याकडे पाहत होती. मग म्हणाली केव्हापासून हात दाखवतो आहोत, पाच सहा गाड्या गेल्या पण कोणी थांबलं नाही शेवटी चालू लागलो पण तुम्ही हात न दाखवताच थांबलात. तुम्हाला भेटण्याचा योग होता पहा." त्या तिघी बसल्या, एक आजी होत्या आणि दोघी चाळीशीच्या बायका. त्या नंतर ताथवडेला आजींना आणि चिखलीला त्या दोघींना सोडे पर्यंत किशोरीताई पण गप्प झालेल्या, आदी पण गप्प आणि कधी नव्हे ते माझीही बोलती बंद करण्यात आलेली. फक्त एकचं बाई बोलत होती श्वास न घेता! दोन वेळा पाण्याची बाटली पुढे केली तिलाही हातानेच नको म्हणत टेप चालुचं होती. माझं आपलं "हो का? अरेरे,अरे वाह, बापरे " एवढ्या शब्दांपुरताच बोलणं मर्यादित होतं. ड्रायवर साहेबांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल होती. आपल्या बायकोचं तोंड पण कोणीतरी बंद करू शकतं हे पाहून त्याचा आनंद उतू जात होता!


पण पॅनोरमावल्या काकांचा शब्द वापरायचा तर, सॉलिड एन्टरटेनिंग बाई होती. गप्पा रंगवून सांगणे ह्याचा अर्थ मला तेव्हा समजला. इंद्रधनुष्यात काय, इंद्राच्या दरबारात जेवढे रंग नसतील तेवढे सगळे वापरून बाई कथा सांगत होती. रंगपंचमीला सर्वात छपरी पोराच्या थोबाडावर नसतील इतके रंग त्या बाईच्या गप्पांमध्ये होते. हो दोन उपमा सुचल्या. मला दोन्ही आवडल्या म्हणून दोन्ही वापरल्या कारण "फुकट ए" (भाडिपा फॅन्स ना समजलं असेल). तर ह्या न थांबता रंगीत गप्पागोष्टी करणाऱ्या बाईला मी मनात "लेडी पु.ल" चा दर्जा देऊन टाकला. हि आमची आई, हि बहीण, आमचं माहेर अमुक गावचं, शेती तमुक गावची, कशा कशाची शेती आहे ह्याची यादी, मला दिलेली ह्या गावी, बहिणीला दिलेली त्या गावी, ते अगदी मुलीच्या लग्नात किती खर्च केला, तिला काय काय दिले म्हणजे "हुंडा म्हणून नाही हं" हा विशेष उल्लेख. एकूण त्यांचा पूर्ण परिवार, नातेवाईक, भाऊबंद, मैत्रिणी, शत्रू ह्या सगळ्यांची माहिती दिल्यावर म्हणाली "आता गंमत सांगते खरी"! तर त्या तिघी एका लग्नाला गेलेल्या जिथे वधु वर मुहूर्तावर आले नाहीत आणि ह्यांचा जेवणाचा मुहूर्त चुकला. अक्षता टाकून म्हणे पळालो जेवायला तर लोकं लग्न लागायचा आधीचं लाईन लावून उभी. आणि आमच्या म्हातारीला नाही ना पळता आलं! बाहेर अंधार झालेला पाहून तश्याच निघाल्या.

लग्नाची सर्व माहिती अगदी इत्थंभूत सांगण्यात आली. मुलगा कुठचा, काय करतो, मुलगी कुठची, काय करते, कुठे कुठे आणि किती किती शेती, किती खर्च आला असेल ह्याचा अंदाज, हुंडा शब्द न वापरता मुलीला दिलेले अनेक घरातले सामान, अक्षतेत एकूण तांदुळाचे किती दाणे पडले, मुलाच्या मावशीच्या मैत्रिणीच्या मुलीच्या बहिणीच्या आईने नेसलेल्या साडीचा रंग..... तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्या लग्नावरून त्यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय आला. त्यांना लग्न छोटं करायचं होतं पण मुला कडच्यांना मोठं कार्यालय हवं होतं. इथे गावाकडे कार्यालय म्हणजे साधंसुधं नसून मोठ्या मैदानांना जोडलेलं असतं. होर्डिंग लावून अख्या जगाला बोलावण्यात येतं, आणि शान काही विचारू नका. एक नवरदेव हेलिकॉप्टरहुन लँड झालेला आम्ही आमच्या गरीब डोळ्यांने स्वतः पाहिलेलं आहे. पण इथली लग्न हा एक मोठा आणि मजेशीर विषय आहे, तो नंतर कधीतरी सवडीने सांगेन. तर हो आपल्या लेडी पुलंच्या मुलीच्या सासरच्यांने एक स्विफ्ट आणि एक बुलेट पण मागितली होती. "सगळेच देतात ओ आमच्यात म्हटल्यावर दिलं आम्ही पण. शेवटी स्टेटसचा प्रश्न आहे. आणि आता मुलाच्या लग्नात होईल ना वसुली!" हे सगळं ऐकून मला वेगळ्याच जगात डोकावतेय असं वाटलं. आपण आपल्याच सारख्या लोकांमध्ये मिसळत असतो त्यामुळे आपल्या विहिरी बाहेर खरोखर समाजात काय चाललंय ह्याची आपल्याला अजिबात माहिती नसते. फेसबुक वर हुंडा बंदी, घरगुती हिंसा, भ्रूणहत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अश्या अनेक विषयांवर चर्चा करतो, वाद घालतो, कोणी “भक्त” तर कोणी “लेफ्टिस्ट” तर कोणी “इंटलेकचुअल” असे लेबल लावत सुटतो पण वस्तुस्थिती खरचं माहित असते का आपल्याला?

"ओ ताई कुठे हरवलात? आता गंमत सांगते खरी!" बाईकडे फारच गमती होत्या सांगायला. "परवाच आम्ही एका मुलीला पाहायला गेलो होतो." "परवा" हा शब्द कालच्या आधीचा किंवा उद्याच्या नंतरच्या दिवसा पर्यंत सीमित नसतो. भूतकाळात कधीही झालेल्या गोष्टीला "परवा" वापरला जातो. उदाहरणार्थ

"परवाच महाराजांचा राज्याभिषेक झाला", "परवाच न्यूटनच्या डोक्यावर अँपल पडलं", "परवाच माझा जन्म झाला" आणि हो माझ्या आजीचा सुद्धा परवाच झाला! तर अश्या भूतकाळातल्या कुठयलातरी “परवाला” ते मुलगी पाहायला गेले होते. बाई म्हणाल्या "कार्यक्रम छान झाला, सगळं ठरल्यातच जमा होतं पण तेवढ्यात मुलीचे वडील म्हणाले "पन्नास हजार". आम्हाला वाटलं न सांगताच इतकी रक्कम देत आहेत म्हणून आम्ही “कशाला उगाचं” वगैरे पुटपुटून “चालेल आता इतक्या प्रेमाने देत आहात तर” असं म्हणालो. तर ते हसून म्हणाले “तेवढे दिलेत तरच मुलगी देईन!” हि चमत्कारिक मागणी ऐकून आम्ही निमूटपणे तिथून निघालो." आदि ने सुद्धा रस्त्याच्या कडेला गाडी लावून आ वासून मागे पाहिले. त्या पुढे किती मुली पाहल्या वगैरे सांगत होत्या पण मी मात्र रिव्हर्स हुंड्या वरच अडकले होते. समाजात सुधारणा व्हावी व आपली मुलगी मूल्यवान आहे असं समजून रक्कम मागितली की मुलीला विकण्याचा प्रोग्रॅम होता! मला नक्की काय ते समजेना.

"तुकारामांची टाळ आमच्या गावात पडली" असं ऐकलं आणि हुंडा विषय संपल्याचे समजले. बाई एका विषयावरून दुसऱ्या विषयावर ऑलिम्पिक लॉन्ग जंप रेकॉर्ड करण्याच्या हेतूने उड्या मारत होती!
तर तुकारामांने वैकुंठ प्रवासाची सुरवात देहू वरून केली असं मानतात, माझ्या भाचीच्या शब्दात सांगायचं तर देहू वरून टेक ऑफ केला गरुडाने! तर आपल्या लेडी पु.ल कडून आम्हाला समजले कि त्यांची टाळ चिखलीला पडली म्हणून तिथल्या कमानीवर मोठी टाळ बनवली गेलीय.

मग आजी गाडीतून उतरल्या. भरभरून आशीर्वाद दिले जणू आम्ही त्यांना स्वतःची किडनी दिली आहे! साधी लिफ्ट दिल्याचं त्यांना इतकं कौतुक वाटलं कारण इतर कोणी त्यांच्यासाठी थांबलं नव्हतं. त्यांच्या आशीर्वादाने संतोष वाटायचा सोडून वाईट वाटलं. ह्या जलद जगात इतकी साधी मदत करायला देखील कोणी थांबत नाही. वर्तमानपत्रात अनेकदा वाचतो आपण अपघाताने माणूस रस्त्यावर पडलेला ज्याला कोणी मदत केली नाही आणि त्यानं जीव गमावला. कोणीतरी भल्या इसमाने मदत केली, हॉस्पिटलला नेले हे मात्र खूप कमी वेळा वाचण्यात येतं. मानवातील माणुसकी खरंच लोप पावतेय का?

"आता एवढ्या उशिराच्या लग्नांना जायचं नाही आई तू" आजींना ओरडून सांगण्यात आलं. नंतर न विचारताच आम्हाला सांगितलं "आमचा थोरला आणि धाकटा भाऊ दोघेही पाटोपाट गेले, त्यामुळे आईला इच्छा असेल तिथे नेतो. " अश्या वेळी काय बोलावं काही समजत नाही. पण आम्हाला फार विचार करायला लागला नाही कारण बाईंने विषय चुटकीसरशी बदलेला. मग चिखली आल्यावर मनापासून चहाला या असा आग्रह केला गेला. "पोहे करते" हे दोन शब्द ड्रॉयवरच्या कानावर पडताच त्याच्या चेहऱ्यावर तेज आलं. तो काही बोलण्याच्या आत मी म्हटलं येऊ सवडीने कधीतरी, आता घर समजलंय. जरा हिरमुसूनचं ड्रायव्हरने गाडी सुरु केली.




डोक्यात बरेच विचार आले, किती विषयांकडे पाहायचा नवा दृष्टिकोन सापडला अवघ्या पाऊण तासात. टेकडी वरचे फोटोवाले काका काकू जे सात हजारचा अल्बम बनवतात ते जेवायला लाईन म्हणून असेच निघून अंधारात चालणाऱ्या त्या तीन बायका, बराच मोठा प्रवास घडला होता एका संध्याकाळीत.
आम्ही बरेचदा अनोळखी लोकांशी बोलतो, मला मुंबईत रिक्षा टॅक्सिवाल्यांशी बोलून झालेली सवय. पुस्तकांमध्ये, चित्रपटांमध्ये कधी सापडणार नाहीत अश्या गोष्टी ऐकायला, पाहायला मिळतात.  
बोरिवलीला स्टेशनहून घरी जाताना एकदा "कांदिवलीचा बच्चन" म्हणून ओळखला जाणारा रिक्षा ड्रायवर भेटलेला. महेश्वरला नर्मदा काठी एक आजोबा भेटलेले जे शिक्षक म्हणून रिटायर झालेले आणि आम्हाला पाढे  कुठपर्यंत येतात विचारत होते. पवनाहून येताना एका तरुण जोडप्याला लिफ्ट दिलेली जे हॉस्पिटलचे कर्मचारी होते. तो पोरगा आम्हाला नक्की हॉस्पिटला या असं चार वेळा सांगत होता आणि त्याची मैत्रीण त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत होती. मैसोरचे अतिशय गोड आजी आजोबा ज्यांने भरपूर मासे खाऊ घातलेले कारण पहिल्या दिवशीच काय आवडतं विचारल्यावर आदी जोरदार आवाजात फिश बोलला होता. मांडूला भेटलेले फ्रेंच बोलणारे गाईड,अथिरापलीला भेटलेले गुजराती कुटुंब ज्यांचा जन्म लंडनचा होता आणि राहत केनियात होते! लांगकावीला भेटलेल्या ऑस्ट्रेलियन बहिणी ज्यांने मराठीत ऑंटीला काय बोलतात विचारलं  होतं आणि मग आम्हाला मावशीच म्हणायचं असं जाहीर केलं होतं. आदिला, "you should help your wife in household chores" धपाटा मारून सांगितलेलं!

असे निरनिराळ्या छटांचे लोक भेटले. खरंच लेडी पु.लं म्हणाल्या प्रमाणे ह्या सर्वांना भेटायचा योग होता.
आमच्याकडून त्यांना काही मिळालं का ठाऊक नाही पण त्या सर्वांकडून आम्हाला खूप काही नवीन ऐकायला, शिकायला, विचार करायला मिळालं. 

इतरांशी ओळख पुन्हा कधीतरी जरूर करून देईन.




Friday, 10 May 2019

मम्मा



You can listen to this on-

दोन दिवस खूप डिस्टबर्ड होते, कारण काय ओ, नेहमीचं
तुमचं आमचं सारखाचं - "नाती"...

नाती म्हणजे ना एक न उलघडणारं कोडं आहे.
"त्यांना जपावं, ती तोडू नयेत, रक्ताची नाती म्हणजे सर्वात घट्ट" वगैरे वगैरे, आपण नेहमीचं ऐकतो.

हल्ली व्हाट्सएप वरचे मेसेज तर संस्कार चॅनलला टफ देतात! पण वस्तुस्थिती काय आहे? काय असते?
तुमची आमची सारखीचं....

काही नाती रक्ताची असो, जवळची असो नाही टिकत 
कारण प्रयत्नसुद्धा दोन्ही बाजूने व्हावे लागतात.
काही जणांचा स्वभाव, आयुष्याचा दृष्टीकोन, विचारपद्धती
हे काही केल्या नाही जुळत आपल्याशी.
मग का बळजबरी हे नात्यांचे धागे बांधून ठेवावे?
हे धागे नसून बेड्या होऊन जातात!

प्लेन मध्ये सांगतात पहा इमरजंसी मध्ये पहिले स्वतःला ऑक्सिजन लावावे आणि मगचं दुसऱ्याची मदत करावी
तसं काहीसं इतेही लागू पडतं. आपलं मानसिक संतुलन टिकवणं सर्वात महत्वाचं, त्यानंतर तुमच्या जवळच्या काही लोकांना, नात्याने नव्हे हं, मनाने जवळ असलेले त्यांना जपावं. बळजबरीच्या नात्यांने फक्त त्रास होत असेल 
तर ती कीड वेळीचं आपल्या आयुष्यातून काढायला हवी!

आपल्या सर्वांनाच हा अनुभव असेल की मैत्रीची नाती किंवा कधीकधी काहीही संबंध नसून अचानक एखाद्या प्रसंगामुळे झालेली नाती ही जास्तं जवळची ठरतात.
आपल्या सुखात मनापासून खूश होणारे, आपला मत्सर न करणारे, आपल्या दुःखात खरं सांत्वन देणारे, प्रसंगाच्या वेळीस मदत करणारे, हेचं खरे नातेवाईक!

ह्यात आणखी एक ट्विस्ट असतो बरं का?!?

"मी ना त्याला दहा तोळ्याची मदत केलेली, त्यानं मात्र मला पाचंच तोळ्याची केली, कसं कदर नाही पहा!"

"वीस वर्षांपूर्वी आम्ही मदत केली नसती तर आज हा इथे नसता, त्यामुळे त्याच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय हा आम्हाला विचारूनचं घेतला गेला पाहिजे! त्यांने आयुष्य कसं जगावं हे आम्ही ठरवणार!" 

"हो केलं मी त्याचं नुकसान, तर काय झालं? मागे मी मदत केली नसती तर काय झालं असतं?"

असे एक ना अनेक प्रसंग तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलेले असतील. मदत सोन्यासारखी तोलूनमापुन करणारी लोकं.
नात्यांच्या हिशोबाचा एक स्पेशल फोल्डर कायम ह्यांच्या डोक्यात तयार असतो! नात्यात हिशोब आला की नात्यांचं डीमोनेटायझेशन झालचं म्हणून समजा!

नाती टिकवण्याचा प्रयत्नचं करू नये असं माझं मुळीचं म्हणणं नाही, जरूर करावा पण सारखचं तोंडावर पडत असाल तर काही तोंडं न पाहिलेलीचं बरी!

डोक्यात त्रागा असल्यांने ह्या वर अजून खूप लिहू शकेन
पण मग ते टोकाचं होईल. सायकायट्रिस्ट वर इतके पैसे खर्च केले आहेत की ते म्हणतात तसं बालन्सड राहण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे!

तर डोक्यात वाफ जमून जमून जेव्हा शेवटी माझी शिट्टी वाजली तेव्हा नकळत मम्माला फोन लावला गेला. इकडची तिकडची चौकशी केली पण तिला बहुदा आवाजा वरूनचं समजलं की हिची शिट्टी वाजलेली आहे!

"तू काय म्हणतेस?" हे तीन शब्द ऐकताच, माझी वरबल डिसेंटरी सुरू झली. आधी राग, मग रडणं, मग ओशाळणं,
मग "तुला उगाचं त्रास दिला" ह्याचा अपराधीपणा वाटून घेणे
अगदी ठरलेली सायकल!

अशा वेळी मम्माचं लागते ना? बाबा कितीही जवळचे आणि अगदी व्यवस्थित विचार मांडणारे वगैरे असले तरी ते योग्य तेच बोलणार म्हणजे तुमच्यासाठी योग्य नाही हं, समाजात जे योग्य मानलं जातं ते! 
"सगळीकडे असचं असतं", 
"तुझही चुकतंय", 
"एवढा राग कशाला यायला हवा?" 
"आपल्याहून मोठे प्रॉब्लेम्स असणारे किती लोकं आहेत?" "तुझं कमीतकमी हे आणि ते तरी चांगलय!" 
असे शहाणपणाचे बोल ऐकण्याची आपल्या मनाची तयारी नसते कारण शिट्ट्या ऑलरेडी वाजलेल्या असतात! 
अश्या वेळी मायेची हळुवार फुंकरचं लागते (व्हाट्सएप वरच्या मेसेजेसचा परिणाम!) 

मम्मा मात्र शांतपणे ऐकून घेते, हो ला हो म्हणते, 
"तुझं अगदी बरोबर आहे" सांगते, जे ऐकायला आपण सर्वात जास्तं उत्सुक असतो!
पण हळूच एक "पण" पण टाकते
"सगळं बरोबर आहे तुझं पण जरा असा पण विचार करून पहा." सावधपणे सल्ला देते. 

शेवट कायम ठरलेला,
"काही खाल्लं आहेस का? आधी खाऊन घे...
थोडा वेळ झोप निवांत...लोकांचा विचार करू नकोस... नाही तर इथे येतेस का सरळ काही दिवस?"
थांबलेले अश्रू पुन्हा गळू लागतात. मग नंतर फोन करते म्हणून फोन ठेवायचा.

रडून डोकं दुखत जरी असलं तरी हलकं वाटतं. 
काही विशेष मार्ग वगैरे सापडलेला नसतो.
परिस्थितीही काही बदललेली नसते.
नात्यांचा गुंता तसाच राहतो.
पण बदला असतो आपला दृष्टिकोन,
आतून एक उर्जा मिळते चालत राहण्याची..

दगड फेकणारे कधीच कमी होणार नाहीत पण आपण आपल्याला ते किती लागू देतोय हे अपणाचं ठरवायचं
आणि जखम बरी करायला आहेचं "मम्मा"....

Tuesday, 7 May 2019

तीन बोजी


I saw this amazing pic clicked by Prachi Gadkari while scrolling on Instagram.
The contradictions in this visual were so strong that I couldn't resist writing something based on it...




तीन बोजी

काळवंडलेल्या भिंतीवर चिकटवलेली पत्रकं
सगळ्या देवदेवतांची हजेरी आहे
शिव, कृष्ण, गणपती, साईबाबा
दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती
धर्म विकणं काही साधीसोप्पी गोष्ट वाटली का?!?

असो, तर ह्या सर्वांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेत,
ह्या पुण्यवान भिंतीचा आधार घेत,
क्षणभर विसावा घेतलाय 
आपल्या तीन नायकांनी, त्यांच्या बोज्यांसह

एक बोजा तारुण्याचा
कपड्यात आहे यौवनाची हिरवळ,
चेहरा मात्र त्रस्त
भविष्याचा विचार करत असेल का तो?

एक बोजा वर्तमानाचा
सौभाग्याची लख्ख गुलाबी साडी,
हात मात्र कपाळावर
कदाचित विचार करतेय सद्य स्थितीच्या ताणांचा

एक बोजा उतार वयाचा
पांढरे केस, डोक्यावरून पदर,
अविर्भाव विचारात मग्न असल्याचे
बहुदा भूतकाळात हरवलीय ती

काय गम्मत आहे ना?
प्रदर्शन मांडलंय देवांचं,
धर्म विकणार्याने ह्या भिंतीवर
काळचक्रात अडकलेल्या आपल्या नायकांनसाठी मात्र
काही काळ पाठ टेकायला जागा आणि सावली,
ह्या खेरीज बाकी काहीच करू शकत नाहीय
ही "पुण्यवान" भिंत...

एकीकडे आहेत ही मेहनती लोकं,
पोटापाण्यासाठी रोज धडपड करणारी,
रक्ताचं पाणी करून पैसे कमावणारी
तर दुसरीकडे आहेत धर्माचा धंदा करणारी,
धर्मा वरून रक्त सांडणारी,
देवांचं मार्केटिंग करणारी!
मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल सारखी
देवांची पत्रकं चिकटवणारी!
तसं देवही मोस्ट वॉन्टेडअच आहे म्हणा
कारण कष्ट करण्यापेक्षा,
हात जोडणे केव्हाही सोपेच!

माडगूळकरांचे शब्द आठवले -
"देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी..."

देवळात, मस्जिदित, चर्च मध्ये
अश्या एक ना अनेक प्रार्थनास्थळात,
राजकारणात, धर्मात, पत्रकात
कैद केलीय आपण आपली देवाची संकल्पना
ह्या अश्या परिस्थितीत,
चराचरात असलेला, आपल्यात असलेला,
देव आहे का जागा?!?

काळाच्या घावांवर फुंकर मारणारा
कोणी सापडेल का आपल्या नायकांना?!?

Tuesday, 30 April 2019

Tug-of-war


Based on the above art prompt by Shweta Ektare and Bullock Cart Poetry


We desire to escape gravity
To spread our wings and fly away
To not be bound by anyone or anything
To be free
Yet,
to feel rooted
To be wired to and to have
something to call home
To have our people
To have the one
To propagate
To settle

We desire to have secrecy
To keep our own little world safe
To document, fold, cover and seal it
Yet,
to have connections
To  speak and listen
To share one's world with others

Are we a mess of contradictions?
or is this what makes us human?

Wings can be clipped
Wires can be cut
Seals can be broken
Connections can be disconnected
What would we be then,
without our game of tug-of-war?







Monday, 29 April 2019

Warmth





An ice Gola
Cold as death
Hiding under syrupy goodness
Lick
Slurp
Lick
Slurp
The kiss of life
A dip in the elixir
loudly coloured
Lick
Slurp
Lick
Slurp
Till death meets its colourful death
Glug
Glug
Glug
Stained tongue oscillates
As the victory flag


Thursday, 25 April 2019

लपंडाव






You can listen to this on https://www.dropbox.com/s/effzuvgw6twx4d0/Lapandav2.wav?dl=0

किती ते सरळ, साधं, सालस रूप
एखादा म्हणेल किती निरागस आहे
सडपातळ बांधा, गोल चेहरा, चकचकीत त्वचा
स्वभाव तर काय
पडेल ते काम करणार
कामात डोकं पूर्णपणे बुडवणार
पण मेलं कारटं सापडलं तर खरं
गायब होणं हा ह्याचा स्वभावधर्म
किती किती म्हणून शोधायचं ह्याला
सगळी मेली भावंडं सारखीचं
नेमकं हवं तेव्हा गायब
अनिल कपूर सारखे लाल लाईटमध्ये पण दिसत नाहीत!
आपण आपलं त्यांना खास जागा द्यायची
ताटातूट नको म्हणून सर्व भावंडांना एकत्र ठेवायचं
त्यांची कामं झाली की न्हाऊ माखू घालून
हातपाय पुसून त्यांच्या घरात ठेवायचं
पण ह्यांना आहे काही त्याचं!
जातात ते जातात पण मला प्रश्न पडतो
नेमके जातात तरी कुठे आणि कसे हे चमचे?!?
ड्रॉवर मध्ये का ह्यांना पाय फुटतात?
की थानोस नावाचा कोणी काटा टिचकी वाजवतो?
की त्या पकडी बरोबर पकडापकडी खेळतात?
तुम्हाला संगते त्या लायटर आणि पकडीच्या नादाला लागूनच हे बिघडलेत!
कायम आपलं लपंडाव खेळायचा!
शाळा कॉलेजात शिक्षकांचे चमचे
ऑफिसात बॉसचे चमचे
राजकारणात तर चमचेच चमचे!
मेल्या किचनच्या ड्रॉवर मध्ये सोडून
सगळीकडे सापडतात हे चमचे!

किचन मधून आवाज येतोय
पाहते हं थांबा जरा
काय ग म्हशे, उगीच नावं ठेवते आम्हाला!
एक तर आम्हाला डब्यांमध्ये कोंडून ठेवतेस
कधी साखरेने गुदमर तर कधी मिठाने
लोणच्याच्या बरणीत अंगाची किती आग आग होते!
तीच गत लाल तिखटाच्या डब्यात
तूप आणि मध तर गिळगिळीत चिकटतं अंगाला
आणि फ्रिज मध्ये अंगात हुडहुडी भरते ती वेगळी!
त्यात उपाशी पोटी
मेथी पावडर दोन चमचे
लिंबूरस मध दोन चमचे
दुधीचा रस चार चमचे
कारल्याचा रस तीन चमचे
आपलं व्हाट्सएप मध्ये सांगतील तेवढे सगळे उपचार
तुझी चरबी काही कमी होतं नाही
आम्ही आपलं घाम गाळतोय
अर्ध आयुष्य तर आमचं जातं तुझ्या सिंकच्या तळाला!
आपलं उचलं,वापरलं,टाकलं सिंक मध्ये!
चव तरी कितीदा पहावी स्वयंपाक करताना?
आणि मग वरून भांड्यांचा डोंगर
कसं कसं आणि काय काय सहन करतो आम्ही
त्यात चोराच्या उलट्या बोंबा
शेजारी आमचे काटे आणि सुऱ्या
त्यांच्या पण ह्याचं व्यथा
कामगार युनियन आहे आमचं
वेळेत सुधार नाही तर संपच करू!

अच्छा तर सख्यांनो मी काय म्हणत होते
सगळं कसं जागच्याजागी ठेवावं
स्वयंपाक घरात कशी शिस्त असावी माणसाला
असोत, मी जरा युनियन बरोबर वाटाघाटी करते!
शेवटी कसं आहे ना
स्वयंपाक घरात असो, ऑफिसात असो वा राजकारणात
चमच्यांचं आणि आपलं जमेना
आणि चमच्यांन वाचून करमेना

Wednesday, 24 April 2019

Saltwater




My phone says
"your lens may need cleaning"
Pictures shouldn't be blurry
Blurry, watery images
was all I knew
Slumber, Valencia, Inkwell
were not the filters to be
Life drenched in salt water pools
was all I could see
Blink them away, I was told
Them falling was a weakness
In between the blinks
life kept swimming in the pools
I let them fall now
and the world hasn't ended
by drowning in them
I clean the camera lens
with its special microfiber cloth
It wipes away the blurriness
as his fingers wipe mine
Clarity is a gift
but sometimes you also need
the world to fade
When I need the blurred now
I opt for the sea instead of the pools

Tuesday, 23 April 2019

सांज




A summer evening
A blooming garden
Basic
Grass
Trees
Swings
A baba playing ball with his kid
An aai clicking that moment
A baccha being a baccha
Love
Life
Innocence
Basic

Monday, 22 April 2019

टोपीवाला पोपट



 Based on the above picture by Shweta Ektare and Bullock Cart Poetry

Listen to the audio on

https://www.dropbox.com/s/u8fdc9wawmeq5kr/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9F.wav?dl=0

पाहताच क्षणी ह्या चित्राला
एक गंमतीशीर बालगीत आठवलं
"शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा,
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला
मित्रांनो देवाघरची लूट देवाघरची लूट
तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय?"

तसं बालगीत आणि नेत्यांच्या भाषणात
नाही फार फरक
पुन्हा पुन्हा तेच बोलायचं
यमक जुळवत राहायचं
तसही देशाच्या प्रगती पेक्षा
नारेबाजी महत्वाची
तर....

खुर्चीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला
मित्रों, जनतेकडली लूट, जनतेकडली लूट
तुम्हा आम्हा सर्वांना आहे सब छूट
एक एक मंत्रिपद प्रत्येकी
ह्या सत्तेचे कराल काय?

साठ वर्षे सत्ता धरून
केला कोणी भ्रष्टाचार
तर अच्छे दिनचा वायदा करून
केला कोणी धार्मिक हटवाद
आता काय तर
कोणी करतंय सगळ्यांचा विकास
तर कोणी करतंय न्याय
शेवटी सगळा डोंबाऱ्याचा खेळ
एकाच माळेचे मणी सगळे
लालची,भ्रष्ट, खुनी, गूंड, गुन्हेगार
आहेत पाळले सगळ्यांनीच
कापडं कोणाची हिरवी, कोणाची भगवी तर कोणाची निळी
चारित्र्य मात्र सगळ्यांचचं काळं
प्रचार, व्यभिचार, भ्रष्टाचार
किती साम्य आहे ना ह्या शब्दांत?!?!
जवळ जवळ सारखेच उच्चार

"पोपट म्हणाला
छान छान छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
आपुल्या शेपटाचा उपयोग करा...
नाहीतर काय होइल?
नाहीतर काय होइल?
दोन पायाच्या माणसागत आपलं शेपुट झडुन जाईल.."

सत्तेच्या देणगीचा ठेवा मान
आपल्या मंत्रिपदाचा उपयोग करा
नाहीतर काय होइल?
नाहीतर काय होइल?
काय होणार आहे
पाच वर्षांनी विरोधी पक्ष निवडून येईल!

पण माझी पोपटपंची राहुद्या बाजूला
शेपूट नसलेले प्राणी आपण
पण उत्क्रांती मुळे मेंदू नक्कीच विकसित आहे
मग वाचवूया आपलं जंगल
इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती
पण मार्ग तर शोधायलाचं हवा
चला माहिती करून घेऊया-
उमेदवारांची
पक्षांच्या जाहिरनाम्यांची
शिक्षण, शेती, संरक्षण, रोजगारी
ह्यावर कोणी किती काम केले ह्याची
सशक्त, जाणकार मतदार बनुया
चला मतदान करूया...

आणि हो, NOTA दाबून मत्त फुकट घालवू नका
नाही तर असं व्हायचं की
तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले!







संतप्त आई


The theme for Earth Day 2019 is
 'Protect Our Species'. You can read about it on https://www.earthday.org/campaigns/endangered-species/earthday2019/

Also don't forget to see today's Google doodle.

Here is a miniscule contribution from my end 

Listen to it on




चक्कर येईस्तोवर गोलगोल फिरून
दिवस रात्र तुम्हाला देते मी
तुम्ही मात्र एक दिवस धरून
होता मोकळे मला साजरी करून

घोषणा काय, सभा काय
चित्र, चित्रपटं, कविता काय
आणि नंतर ये रे माझ्या मागल्या!
एक दिवस तरी येते माझी कीव तुम्हाला
हे ही माझं भाग्याचं म्हणायचं
पण फक्त प्रचाराने काय तुम्ही तरणार
अमंलबजावणी कोण तुमचा काका करणार!

"सर्वात हुशार लेकरं माझी,
असेनात का थोडी स्वार्थी"
असं स्वतःला समजावून दमले मी
आडनाव नाही मेल्यानो माझं दामले
मी म्हणतेय सहनशीलतेचा झालाय माझ्या अंत
त्रास देताय तुम्ही मला अत्यंत
माझचं चुकलं लाडावून ठेवलं तुम्हाला
वेळेतचं कान हवा होता पिळायला
माझ्याचं उदरातून आलात सगळे
पण कितीतरी बाळांचा माझ्या केला नाश तुम्ही
पापाची फळं भोगावी लागतील ह्याच जन्मी

वय झालयं आता माझं
शिस्तीत लागा वागायला
होतोय त्रास माझ्या लेकरांना इतर
कारण तुमचं वाढतंय लिट्टर
पुरे झाली तुमची थेरं
नाही तर शिव्या घालतील तुम्हाला तुमचीचं पोरं!



Saturday, 20 April 2019

दुपट्टा




Another interpretation of the same art

You can listen to it on
https://www.dropbox.com/s/6p2jwv0hzsc49x6/Dupatta.wav?dl=0

मऊ सूती कापड
गडद निळा, नाजूक बुट्टी
सुंदर कलमकारी दुपट्टा होता
निरखून तो पाहत होता
आरसे त्यावर निरनिराळ्या आकाराचे
वाढवत होते शोभा कापडाची
प्रतिबिंब दिसलं त्याला त्यात त्याचं
सावळा रंग, धारदार नाक, कडक मिशी
पण एक नाही, अनेक प्रतिबिंब
प्रत्येक आरश्यात निराळं
कशात दिसलं त्याचं बाह्य रूप
तर कशात त्याचं खरं रूप
सुंदरशी एक स्त्री, मोकळे केस, गुलाबी ओठ
पण बाजूच्याच प्रतिबिंबात
एक गोंडस मुलगा
त्या बाजूलाच एक अल्हड़ तरुणी
मध्येच एक स्वच्छंदी पक्षी
पुन्हा ती स्त्री
पुन्हा तो पुरुष
तो ती तो
प्रतिबिंबच प्रतिबिंब
जणू त्याच्या चैतन्याचे हजारों तुकडे
त्या ओढणीवर विखुरलेले
"बायकोसाठी घेताय का?"
प्रश्न पडला त्याच्या कानी
अचानक जाग आल्यागत
दचकून वर पाहिलं त्यांने
पराभूत स्मित देऊन म्हणाला,
"हो तिला खूप आवडेल, पॅक करा"...

Inkpot




Based on the above exquisite painting by Shweta Ektare, below is my interpretation


A Blank paper
A quill
An inkpot
Deep indigo ink
Reflecting the author's mind
Flowers and creepers he sees
Mesmerized by the beauty
Deeper he looks
Scattered pieces of a broken glass
A puzzle to be solved
He sees his characters
Glimpses of them
Not fully revealed yet
His protagonist looks up at him
Silently narrating her story
Introducing him to the other characters
He sees himself flying between them
Trying to peep into their souls
He sees his own
Reflected by the ink...



Friday, 19 April 2019

शत्रू


Sculptures 4 (part of the sculptures series of poems which are based on these stone sculptures in Maheshwar)

Listen to the audio on

https://www.dropbox.com/s/xt7eaqdi4ly6enw/Shatru.wav?dl=0

हत्ती म्हणाला उंटाला
उठ! पाहू तू उंच की मी!
मान असली तुझी जरी लांब
माझी सोंड पण नाही लहान
पाय भक्कम पाहिलास का हा?
हाच चिरडतो शत्रूला
लढायलाही माझीच पाठ
हौदा खालच्या कापडाला खास जरीकाठ
मिरवणुकीचा मान पण माझा
मग काय रे उपयोग तुझ्या मानेचा?!?

उंट म्हणाला,
सोंड रे तुझी इतकी लांब
नाकपुड्या शेवटाला अगदी छान
मग श्वास मोठा घे एक लेका
उभा कशाला? कशाला हाल?
गप्पा मारू बसून छान

पायाखाली चिरडतोस शत्रू म्हणालास
पण नेमका शत्रू रे कोणाचा?
तू तर पडलास शाकाहारी
माणसाची हत्या करायला लावणारा माणूस
नाही का रे शत्रू तुझा?
वर बसून वार करायला
लढाईतली फक्त एक उंच खुर्ची तू
भक्कम पाय तुझे साखळीत कायम
माहुताचा रे गुलाम तू!
मिरवणुकीचा मान तुझा?
की तुझ्यावर मिरवणाऱ्याचा?!?
नको रे असला मान मला
नटवलेला अपमान जो

पाहतो आहेस हा निळा दरवाजा?
लाकडी फळ्या, लोखंडी सळ्या
वर एक मोठं लोखंडी कुलूप
तुझी सोंड काय आणि माझी मान काय
राहणार कायम दाराच्या ह्याचं बाजूला
बलवान अरे गडी तू,
एकटाच तोडू शकशील हा तू
पण धैर्य तुला होणार नाही
कारण खरा रे नेमका शत्रू कोण
तुलाही ठाऊक, मलाही ठाऊक
एक बाण किंवा एक गोळी
किस्सा आपला खतम
हस्तिदंतासाठी तुझ्या,
तुझ्याच कुठल्या भावाला लावतील तुला चिरडायला
जरीचं मग कापड ते, झाकेल तूझ्या शवाला..

आपसात लढून उपयोग रे काय?!?
माणसातला माणूस तर कधीच मेला
आपल्यातला प्राणी तरी वाचवूया
एकीने आपण जगत राहूया
प्राण आपला जपत राहूया https://www.dropbox.com/s/xt7eaqdi4ly6enw/Shatru.wav?dl=0

Thursday, 18 April 2019

चिरतरुण





चिरतरुण

पेठेत फिरतांना दिसला एक जुना वाडा
धुळीचा थर त्यावर
त्या खाली दुसरा थर
थरांवर थर
पोपडे उडालेल्या भिंतींवर
कपची उडालेल्या दगडी पायऱ्यांवर
गंज लागलेल्या बिजागिरीवर
रंग उडलेल्या लाकडी दारांवर
चिरा गेलेल्या दगडी जमिनीवर
सुकलेल्या गोंड्याच्या तोरणावर
धुळीचे थर, थरांवर थर
पण मजबूत आहे पाया
प्रकाशाचा झोत लख्ख पडतोय  
नांदत आहेत नवीन जुनी कुटुंबे तयात
त्या भिंती, त्या पायऱ्या, ते खिडकी दरवाजे
आहेत आठवणींच्या तिजोऱ्या
मायेची सावली आणि पित्याची सुरक्षा देत
ऐटीत उभाय नव्या युगात 

वयाचा थर
थरांवर थर
सुरकुत्यांचा नकाशा 
थरथरते हात
सुकत आलेलं शरीर
वाकत आलेली कंबर
ठिसूळ झालेली हाडं
पण प्रकाशाची ज्योत लख्ख तेवतेय
वोटिंगला न्या म्हणतेय
व्हिडीओ कॉल वर पणतीशी बोलतेय
व्हाट्सअप्प वर फोटो पाहतेय
कवळी लावून पिझ्झा खातेय
पणती कडून लिपस्टिक लावून घेतेय
मायेची सावली आणि पित्याची सुरक्षा देत
ऐटीत उभीय नव्या युगात 
आजी माझी नव्वदीची





Tuesday, 16 April 2019

निवडणुकिंचा भोंगा



Another interpretation of this amazing artwork by Shweta Ektare 

संगीत, निसर्ग, कला
चित्रात दिसूनबी दिसेनासं झालय
निवडणुकींचा चष्मा लागलाय डोळा
फकस्त भोंगा दिसू लागलाय मला
रेकॉर्ड गत गोलगोल पिस्तेय जनता पहा
प्रचारांचा भोंगा फाडतोय गळा
किती किती आणि काय काय ते वायदे पहा
चित्रातल्या भोंग्यातून वाढत्यात फुलांच्या वेली
तर, आश्वासनांच्या वेली उंच वाढत्यात 
निवडणुकींच्या भोंग्यातून
सत्ताधारी पक्ष कांगावा कर्त्यात
तर विरोधी पक्ष आपसातचं लढत्यात
महागटबंधन किंचाळत्यात खरं
पण चित्रातल्या पाखरांवानी एगएगल्या दिशेंना तोंडं कर्त्यात
ह्यो ग्रामोफोनच्या भोंग्यातून यायची थोरांची गाणी 
निवडणुकीच्या भोंग्यातून येणाऱ्या विषाने
मात्र ऐकू येतो फकस्त आक्रोश आपल्या मायभूमीचा

Spinning


Based on the above art work by Shweta Ektare


A gramophone
lost in the mists of time

Drenched in music
creepers dance their way out

The once upon a time music
nurtures nature

The forest fills the spiral grooves
gathering blooms and birds

The record stopped playing
many moons ago

But the music of yore
continues to waft
spinning life along...


योगी


hear it on



घसा माझा दुखतोय फार
खोकला येतोय बारबार 
खालयं तस मी बरचं गारगार
आवाज माझा गेलाय आऊट ऑफ द दार
आणलंय आता योगी कंठीका
योगी असलं जरी इन हिस नाव
त्याला नाही कसलीचं हाव
कंठातून येत नाही त्याच्या बकवास
गप्प बसायला लावत नाही त्याला कोणी 72 तास
ही सेझ मी आहे कंठीका, योगी कंठीका
तुझा कंठ मी करेन बरा बीकॉझ आय आम द खरा योगी
आय गॅरंटी तेरी खासी कम होगी
ना रहेगी तू रोगी
अबाउट द अदर योगी त्याच्या कर्माची फळं तो भोगी!