watch it on- https://youtu.be/2YRNj3vpo4A
गरज- शोधाची, प्रगतीची जननी आहे गरज
जगण्याच्या गर्जेनं पोटीच शिकारीची साधने, अग्नी, चाक, ते अगदी शेती, गाव, भाषा, संस्कृती,
सगळ्याची निर्मिती झाली.
गर्जे पोटीच माणसाची प्रगती झाली; शेतीतून बाझार, गावातून शहर, चाकापासून सुरवात होऊन अगदी विमान आणि शिकारी साधनांपासून इतर ग्रहांवर पण पोचण्याची झेप आपण घेतली.
प्रांण्यांच्या चांबडीची कापडं घालून, दगडांना घासून आग पेटवण्यातचं आपण समाधानी राहिलो असतो तर आज वरची प्रगतीचं झाली नसती.
खरंच गरज ही प्रगतीची जननी आहे
पण ह्या माय माउली गरजेची, सीमा नाही का ओ काहीच?
हनुमानाच्या शेपटी सारखी वाढतंच जाते गरज.
गरिबाला भाकरीची गरज, श्रीमंताला अधिक श्रीमंतीची गरज,
मध्यम वर्गीयाच्या तर गरजांना पण गरज!
पैशाची गरज, प्रतिष्ठेची गरज, कीर्तीची गरज, name fame money
पण रातोरात हजाराच्या नोटीचा कागद होतो
मग तो गुंडाळी करून फुकायला वापरा किंवा पुसायला!
कलेला सुद्धा गरज
कविला श्रोत्यांची गरज, कवितेला शब्दांची गरज, शब्दांना अक्षरांची गरज
हल्ली काय तर likes, shares, views ची पण गरज.
viral आधी फक्त ताप, सर्दी, खोकला असायचा ओ,
हल्ली ज्याला त्याला हव झालय viral!
असोत, निसर्गाला पण गरज चुकलेली नाही
पिकाला मातीची गरज, मातीला पावसाची गरज, पावसाला ढगांची गरज, ढगांना समुद्राची गरज
समुद्राला कोणाची गरज?
कदाचित गरजे प्रमाणेच निरंतर असलेल्या अथांग समुद्राचं जुळत असेल बुआ गरजेशी
समुद्रावरून आठवलं हल्लीच कोकणांत गेले होते
Sidenote- Instagram व facebook वर टाकलेले
फोटोस जरूर लाइक करा,
Social media validationची गरज
आंजर्ल्याच्या डोंगर कडेवरल्या गणपती पासून ते दाभोळच्या गुहेतल्या चंडिके पर्यंत गर्दी फक्त गरजूंची
भक्ती नाही ओ गरज.
पूजेत गरज, मंदिराच्या घंटानादात गरज, गाऱ्हाण्यात गरज,
नमस्कारात गरज, नमाझात गरज, मास मध्ये गरज
जात कुठलीही असो, धर्म कुठलाही असो, देवाची मूर्ती कुठलीही असो,
भक्तीची जननी सुद्धा गरज
देवाला तरी चुकलीय का गरज?
होती काही गावाच्या कोपऱ्यात झुनी मंदिरं धूळ खात पडलेले तिथे गणप्या, हणम्या, शंकऱ्या
नवसाला पावतो अशी महती नाही बिचाऱ्यांची त्यामुळे त्यांना पुसायलाही कोणी नाही
शेवटी त्या दगडाच्या देवाला पण आहेच गरज
किती केविलवाणं आहे ओ आपलं अस्तित्व
जन्माला येताच भोकाड पसरलं, रडगाणं सुरु,
प्रथम आईच्या दुधाची गरज
खांद्यावर खेळवायला आणि डोक्यावर मिऱ्या
वाटायला बापाची गरज
लहानपणाच्या उनाडक्या करायला आणि शिक्षेत वाटेकरी शोधायला सवंगड्यांची गरज
तरुणाईची तहान भागवायला प्रेयसीची गरज
समाजाच्या बांधिलकीत मात्र राहायला हवचं
मग लग्नाची गरज
सौंसाराची रटाळ बैलगाडी ढकलायला बायकोला नवऱ्याची आणि नवऱ्याला बायकोची गरज
पारिवारिक व्हायला आणि हल्ली इंस्टाग्राम फ्रेंडली गोंडस फोटोस अपलोड करायला मुलांची गरज
मग म्हातारपणी टाईमपास होत नाही म्हणून नातवंडांची पण गरज
कुठे संपते ओ ही गरज?
शवाला पण अग्नीची गरज
कातडी आणि मांस भाजून गळालं कि सांगाडाच उरतो ना?
आत्म्याला पण असते का ओ गरज?
पिंडाला शिवायला पण कावळ्याची गरज
गरज- काळा प्रमाणेच निरंतर,अमर्याद, निस्सीम, अनंत
गरजेला एकचं औषध - समाधान. पण समाधानी झालो तर मग प्रगतीचं काय?
गरज, समाधान, प्रगती, सगळंच कालचक्र
काय तर मग राहा फिरत गोल, गोल, गोल, गोल, जोवर शिवत नाही पिंडाला कावळा....
No comments:
Post a Comment