Drawing by- Shweta Ektare
Prompt by- Bullock Cart Poetry
A talented artist, Shweta made this beautiful drawing and this is the poem I wrote on it-
तो ती
तो
ती
जन्माला तो आला, "खानदान
का चिराग" म्हणवला,
पण जसा जसा
मोठा झाला,
तो ती तो
ती मनात गोंधळ उडाला…
त्याच्यातला तो हनुमानाची गदा
घेई हाती,
पण त्याच्यातली ती
फुलपाखरासारखी उडू पाहे बाहेर.
त्याच्यातला तो चिडून, पुरुषत्त्व
सिद्ध करायला, निवडुंगासारखा काटेरी होतं,
पण त्याच्यातली ती
हळुवार मोरपीस फिरवून शांत करे त्याला.
का मी अनैसर्गिक?
पक्षी पोहू लागले किंवा
मासा उडू लागला तर
अनैसर्गिक होय
पण मी तर
तुमच्या सारखाचं किंवा सारखीचं
कधी तो कधी
ती
तो ती तो
ती
No comments:
Post a Comment