Thursday, 16 November 2017

वादळ, दृष्टी आणि सृष्टी


Drawing by- Shweta Ektare
Prompt by- Bullock Cart Poetry


A talented artist, Shweta made this beautiful drawing and this is the poem I wrote on it- 

वादळ, दृष्टी आणि सृष्टी

बघा, डोळसपणे माझ्या निर्जीव डोळ्यात बघा,
त्या मागच्या मेंदूतला तमाशा बघा,
रेषेत रेष, गुंत्यात गुंता,
समाजाच्या अपेक्षेंच्या वादळाने केलेला पसारा बघा,
आकांक्षाना आकाशात भरारी घ्यायचीय, चिवचिवायचंय
पण वादळात आकांशांचा पण वटवाघूळ झालेला बघा,
मुळं शाबूत आहेत अजून, कुठेतरी नवी पालवी पण दिसतेय बघा,
बघा, उध्वस्त होऊन सुद्धा वादळासमोर हार मानता झुंजणाऱ्या माझ्या मनाकडे बघा.



donhi chi sangata karun Dzinia ne banavlela ha sundar poster- 



No comments:

Post a Comment