Wednesday, 29 November 2017

पंख कापणारे गरुड


किती तो राजबिंडा पक्षी,
पंख पसरवून इतक्या सहजपणे उडतो
जणू आकाशात तारांगतोय
धारदार नजर, धारदार चोच
पण मग निसर्ग असा कसा बावळट?
इतर पक्षांना का जगू देतोय?
Excellence असताना  mediocrity?
पक्षी म्हटलं कि फक्त गरुड हवा बुआ!
मूर्ख सारखं काय बडबडतेय वाटलं ना?
मग आता पक्ष्यांच्या बदली जरा मानवाचा विचार करा....
प्रत्येकाने गरुड बनावं अशी का अपेक्षा?
एखाद्या चिमणी भोवती जेव्हा सगळे गरुड जमून त्यांच्या लेकी तिच्याच चांगल्यासाठी
"गरुड बन, गरुड बन तुज्यात ऐपत आहे उंच उड" म्हणतात
तेव्हा बहुदा त्यांना जाणवत नाही कि ती चिमणी असण्यात खुश आहे,
 पण गरुड बनायचंय दबावाखाली उंच तर सोडा ती उडणच विसरलीय.....


अल्बम

"आतू, तू किती छोटी होती!", माझी भाची वासून माझ्या बालपणाचा फोटो पाहून म्हणाली.
तिच्या लेखी , मोठी माणसं ही कायम मोठीचं असतात, ती आपल्या एवढी कशी असू शकतात?
हेवा वाटतो मला तिच्या निरागसतेचा.
मग छोट्या स्नेहाच्या छोट्या फोटोतील निरागसता दिसते आणि आरश्यात पाहून ते हरवलेलं बालपण शोधण्याचा कासावीस होऊन मी प्रयत्न करते.
आरश्याकडे काहीच उत्तर नसतं, पण दोन क्षण का होईना अल्बम विसावा देतो.
वर्तमानातली भूतं आणि भविष्याची काळजी सोडून बालपणात सामावून घेतो.
माहेरी गेले कि जवळपास २५-३० अल्बम्स आहेत, ते सगळे काढून फटकानं मारून बसणे हे ठरलेलंच.

प्रत्येक वाढदिवसाचे फोटोस- भिंतीवर लावलेल्या क्रेप पेपरच्या रंगीत माळा, भयंकर gaudy अश्या चमकी लावलेल्या कागदाने लिहिलेलं Happy Birthday आणि thermocolच्या अक्षरात लिहिलेलं आपलं ठळक नाव.
लहानपणीच्या मित्र मैत्रिणी, शेजाऱ्यांच्या घोळक्या मध्ये एक एक जण शोधून, "किती वर्ष झाली हिच्याशी बोलून, फोन करायला हवा", असं उगाच स्वतःला खोटं आश्वासन द्यायचं.
बाकी रोजच्या धावपळीत अल्बम मिटला कि जुन्या लोकांच्या आठवणी पण तश्याचं मिटतात.

आम्ही दोघी एकाचं वयाच्या सख्याचुलत बहिणी त्यामुळे अगदी तान्ह्या असल्या पासूनचे सगळे एकत्र फोटोस. कपाळाला आणि दोन्ही गालांवर काजळाचे ठिपके लावलेले to protect from बुरी नजर!
  Matching frocks, matching haircut, matching shoes, मावशीने शिवलेले matching परकर पोलके सगळंच matching. सध्या माझ्याहून शरीराने अर्धी, घाऱ्या डोळ्यांची, नाकील, सुंदर आहे माझी बहीण पण तेव्हा मात्र आम्हाला सगळे जुळ्या म्हणत.
पण आम्ही sandwich मुली होतो, म्हणजे पाच वर्षाने मोठा दादा आणि पाच वर्षाने धाकटा भाऊ. त्यांचे बुआ स्वतंत्र अल्बम्स, एकाला पहिल्या मुलाचा मान तर एकाचे शेंडेफळ म्हणून लाड.
ह्या वरून अजूनही आम्ही मोठ्यांकडे रुसतो.

बर्थडे प्रमाणेच, भाऊबीजेला मम्माच्या कडेवर बसून दादाला ओवाळताना,
अभ्यंग स्नानानंतर एकत्र फराळ करताना,
सणाच्या फोटोस मध्ये विशेष पावडर थापून, लाल भडक लिपस्टिक लावलेले आपले हास्यास्पद फोटोस,
अनेक सहली, पहिला झोपाळा, घराला नवीन रंग मारल्यावर, नवीन furniture केल्यावर,
 मुंबईत कधी नव्हे ते एका वर्षी पडलेल्या थंडीत स्वेटर कानटोपी घालून,
बिल्डिंगच्या gatheringसाठीच्या  fancy dress costumesमध्ये,
गावच्या घराच्या छपरावर बसून काढलेले, खळ्यात तुळशी वृंदावनाच्या शेजारी,
गावच्या डोंगरावर titanic pose देतानाचे,
शाळेच्या uniform मधले आणि अनेकदा तर उगाच सहली नंतर रोल शिल्लक आहे म्हणून काढलेले असे अनेक गंमतीशीर फोटोस आहेत.  हे उघाचचे फोटोस पाहण्यात विशेष गम्मत येते.


रोल वरून आठवलं, सहलीला गेलं कि हल्ली सारखं - उचलला फोन काढला फोटो असं नव्हतं  बरं का?
३६ फोटोस चा रोल, विचारपूर्वक जपून वापरायचा.
म्हणून तर develop करून अल्बम बनवायचे पण इतके कौतुक होते.
हल्लीच्या बाळांचे इतके फोटोस काढले जातात कि मोठं झाल्यावर जरा बालपणीचा दौरा घेऊ असं त्याने ठरवलं तर फक्त फोटोस पाहिला त्यांना नवीन जन्म घ्यावा लागेल.
असोत! पुन्हा जुन्या अल्बम्स कडे वळूयात…..

काही विशिष्ट फोटोस हे आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीच्या अल्बम्स मध्ये असतात.
पूर्ण नग्न अवस्थेत काढलेले आपले फोटोस जे आवर्जून आपले मित्रपरिवार घरी आल्यावर मोठ्या उत्साहाने दाखवले जातात!माझा तसा अभय अरण्यातला, डोक्यावर पिसारा चिकटवलेली टोपी आणि खाली उघडाबंब असा फोटो आहे.
पालकांना दिलेल्या त्रासाचा बहुदा बदला घेण्याचा हा एक मार्ग असावा!
मुलगा असल्यास विशेष मुलींचे कपडे घालून आणि शेंड्या बांधून नटवलेले काही फोटोस असतात, हे सुद्धा पुढे जाऊन embarrass करायला वापरण्यासाठीच पालकांचं एक शस्त्र असणार!
मग असतात शाळेचे ग्रुप फोटोस, त्यात मग उगाच प्रत्येक चण्या एवढं डोकं ओळखता येतंय का पाहत बसायचं आणि विशेष म्हणजे आपल्या better half ची परीक्षा घ्यायची "ओळख पाहू ह्यातली मी कोण?"
समोर कलिंगड आणि ओळखायचा असतो चणा  त्यामुळे त्याच्या नक्कीच नाकीनऊ येतात.
मग असतात आपल्या आयांचे किचन मधले फोटोस, स्टीलच्या भांड्यांच्या चकाकत्या बॅकग्राऊंड वर.
आमच्या मम्माचा वरच्या शेल्फ वरून बरणी काढतेय ह्या पोस मधले १०-१२ फोटोस तरी आहेत.

त्याहून मागे जायचं तर आई वडिलांच्या लग्नाचा black and white अल्बम. हे असे लूकडे, मोठा चौकोनी चष्मा लावलेले आपलेच आई वडील आहेत का ही पहिली शंका.
बाबांचे, काकांचे आणि त्या अल्बम मधल्या सर्वच पुरुषांचे पाय भल्या मोठ्या bell bottomsमध्ये लपलेले.
आपल्या नाजूक सुंदर आईकडे, तिने नेसलेल्या जुन्या पद्धतीचा शालू, मोठाली नथ, त्या काळचे दागिने ते पाहून लहानपणी वाटे आपण कधी मम्मा इतके सुंदर दिसणार?
आणि त्रागा करून वरून तिलाच विचारायचं,”मी कुठे होते? मला का नाही नेलं तुझ्या लग्नाला?”
मग कोपऱ्यात लपवलेला हनिमूनचा अल्बम शोधायचा.
 मध्यम वर्गीय महाराष्ट्रीयन जोडपं म्हणजे हनिमून म्हटलं कि माथेरान, महाबळेश्वर किंवा लोणावळा, घोड्यावर बसलेले फोटोस. आपण आपल्या आई वडिलांकडे एक romantic couple म्हणून कधी पाहातच नाही ना, मग वेगळच काहीसं वाटतं तो हनिमूनचा अल्बम पाहून.


 Black and white फोटोसच्या अल्बम मध्ये प्रत्यक्षं कधीचं भेटलेले आजोबा पण भेटतात
Tall, dark and handsome ही म्हण सांगते माझ्या आजोबांसाठीच बनली असणार,
त्यांची रुबाबदार personality पाहून डोळे दिपतात.
मग आजीला किल्ली देऊन त्यांच्या बदलच्या गोष्टी ऐकण्यात रमायचं.
त्यात बाबा, काका, आत्याचे पण लहानपणीचे फोटोस असतात, मग माझ्या भाची प्रमाणेच मी पण वासून पाहते त्या छोट्या मोठ्यांकडे.
लुगडं नेसलेली, लांब वेणीची माझी सुंदर आजी एखाद्या राजकन्येसारखी दिसते त्या जुन्या फोटोस मध्ये.
 तिच्या नव्या सौंसार्याच्या गोष्टी सांगताना एक वेगळीच चमक येते तिच्या ९५ वर्षांच्या डोळ्यात.
तो अल्बम मला माझ्या पूर्वजांशी गाठभेट घालून देतो, एक sense of belonging देतो.

त्या पुढले काही अल्बम्स असेही असतात ज्यातल्या आठवणी कालच घडल्या सारख्या वाटतात.
बोरिवलीच्या नव्या घरातले पूजेचे फोटोस पाहून मम्माला विचारले होते कि त्यात किती फ्रेश दिसते आहेस किती बदल झाला तुझ्यात पटकन.
मग स्वतःलाच आठवते कि त्या प्रसंगाला देखील १५ वर्षे उलटून गेलीत आता!
तसेच दादा वाहिनीच्या लग्नाचा अल्बम, त्यात साडीत सडपातळ दिसणारी मी (हो कोणे एके काळी सडपातळ हा शब्द मला लागू पडत असे!) त्या नंतरचा दिवाळसण, वाहिनीची पहिली संक्रांत, वरवर वाटणाऱ्या ताज्या आठवणी पण अनेक वर्ष लोटून गेलीत.

गेल्या दशकात, आपले आईवडील वयस्कर झाले, आपले बालपण हरवले, पुस्तकात, स्पर्धेत बुडून जगाशी झुंजण्याच्या तयारीत आपण बुडालो, graduation नंतरची वर्षे तर जणू भुर्रकन उडून गेली.
Sendoffचे, rose dayचे, traditional dayचे पण अल्बम्स आता दहा एक वर्ष जुने झालेत हे जाणवलं कि चटकन डोळ्यात पाणी येतं.
आम्ही कॉलेजला असताना साधारण early 2000s च्या काळात smart phones नव्हते.
 डोक्यावर फेकून मारला तर रक्त काढेल असा good old nokia होता
त्यामुळे कॉलेज daysचे पण कॅमेऱ्याने काढलेले फोटोस आहेत.
त्या फोटोस मधल्या स्वतःकडे पाहून वाटतं कसली भोळसट होती ही मुलगी, totally naive, जगाचं काहीच ज्ञान नसलेली बावळट मुलगी पण तरी सुद्धा पुन्हा ती व्हावीशी वाटतं.
अर्थात ती ३०-३५ किलो कमी होती त्यामुळे आणखीनच वाटतं.
साधारण graduation पर्यंत येऊन अल्बम्सचा दौरा संपतो.

अल्बम्स मध्ये काही भाग रिकामे असतात.
 कोणीतरी त्यातले फोटोस काढून वॉल्लेट मध्ये ठेवले असतात किंवा ते हरवले असतात.
अल्बम बंद करता करता ते मोकळे भाग पाहून वाटतं अंगाची घडी करावी, घडीची अजून छोटी घडी करावी आणि शिरावं त्या मोकळ्या भागात, एकसंग व्हावं त्या मिटलेल्या अल्बम सोबत.
पण जुन्या आठवणींची गंमत येते कारण ते क्षण आपण जगलो.
मग घडी करून अल्बममध्ये लपण्यात कसली आलीय गंमत?
जगूया मोकळेपणाने हे ही क्षण, बनवूया नव्या आठवणी,
अल्बम्स नही hard disk हि सही!
पुढच्या दशकात आताचे फोटोस पाहून पुन्हा थोडंसं रडूया, पुन्हा थोडंसं हसुया…..






Basic



I made an omelette today as basic as it could be
some salt
some pepper
i just let it be
so i thought
let me do that to words
and to life maybe...

Monday, 20 November 2017

तो ती तो ती

Drawing by- Shweta Ektare
Prompt by- Bullock Cart Poetry


A talented artist, Shweta made this beautiful drawing and this is the poem I wrote on it- 

तो ती तो ती

जन्माला तो आला, "खानदान का चिराग" म्हणवला,
पण जसा जसा मोठा झाला,
तो ती तो ती मनात गोंधळ उडाला
त्याच्यातला तो हनुमानाची गदा घेई हाती,
पण त्याच्यातली ती फुलपाखरासारखी उडू पाहे बाहेर.
त्याच्यातला तो चिडून, पुरुषत्त्व सिद्ध करायला, निवडुंगासारखा काटेरी होतं,
पण त्याच्यातली ती हळुवार मोरपीस फिरवून शांत करे त्याला.
का मी अनैसर्गिक? पक्षी पोहू लागले किंवा मासा उडू लागला तर अनैसर्गिक होय
पण मी तर तुमच्या सारखाचं किंवा सारखीचं
कधी तो कधी ती

तो ती तो ती