मला अख्ख जग खायचं होतं
पण जगाने मला खाऊन टाकलं
ढेकर सुद्धा दिला नाही
जगाने मला खाऊन टाकलं
ढेकर सुद्धा दिला नाही
हाडं चक्काचूर केली
चावून चावून चोथा केली
हाडं चक्काचूर केली
चावून चावून चोथा केली
मांस मात्र तसंच ठेवलं
हाडं चक्काचूर केली
चावून चावून चोथा केली
मांस मात्र तसंच ठेवलं
माश्या भिनभिणायला लागल्या
रक्त मांसाच्या गोळ्यावर
अपुऱ्या स्वप्नांच्या दुर्गंधीची झिंग चढली त्यांना
उडून गेल्या दूर
भक्षक अळ्या, बुरशी, जिवाणू सगळे जमले
मात्र मांसाच्या गोळ्यातून येणाऱ्या अक्रोशाने हैराण झाले
कावळे, गिधाडे कोणी जवळ येईना
जगाने खालेल्या माणसाला मृत्यूचे सैनिक पण हात लावेना
मांस लोळतय
आत्मा भरकटलाय
हाडं झाली चक्काचूर
मला जग खायचं होतं पण
जगाने मला खाऊन टाकलं
ढेकर सुद्धा दिला नाही
No comments:
Post a Comment