Wednesday, 31 January 2024

भुताटकी

भुताटकी

मानेवर बसलीय 

भुताटकी

गच्च धरून ठेवलंय

श्वास रोखलाय

पाठीत उसण भरलीय

खांदे आले मोडत

डोकं सुन्न झालंय

भुताटकी सतत बोलत असते 

कानात किंचाळत असते

कधी डोक्यात मुंग्या सोडते

कधी पोटात गांडूळ

कधी डोळ्यात आग ओतते

कधी पायात बर्फ

भुताटकी बसलीय मानेवर

नाचतेय थयथया डोक्यावर

चेंग्रून टाकतेय आतून

कोण ही? कुठून आली? 

आरश्यात पाहते दिसते का

ओरबडते स्वतःची चांबडी 

ओढून काढते केस

आपटते डोकं

पण जात नाही ती 

सण साजरी करून पाहते

फिरून येते जरा

कामं करते खूप

इतकी पळते की ती पडून जाईल

पण लोचट आहे 

सोडत नाही

आरश्यात पाहते

मीच दिसतेय

मीच माझी भुताटकी 



Saturday, 20 January 2024

 भगवा

हिरवा

लाल

काळा 

भगवा


आधी भगवा होता मग हिरवा झाला म्हणून आम्ही परत भगवा केला, चला आता दिवाळी साजरी करूया


पण 93 ला मला फक्त लाल आठवतोय

भगव्यातून पण लाल, हिरव्यातून पण लाल

भारताच्या संविधानातून पण लाल

आणि त्या नंतर फक्त काळा

प्रत्येक मनात 


पण चला आता दिवाळी साजरी करूया