मंत्रमुग्ध करणारी हिरवळीची ती नयनरम्य वाट,
झिजलेल्या चप्पला तुडवतात नित्यनियमाने.
कष्टांच्या काष्ट्याची गाठ घट्ट बांधलीय नियतीने,
सुरकुत्या बनून जणू हिर्वळीतला खडतर
प्रवासच गोंदलाय कपाळी.
हिच पृथा
हिच पार्थी
हिच पार्थीवी
हिच परिशी

No comments:
Post a Comment