कोळी आणि कला
कोळिष्टक पाहिलीत का ओ कधी? जवळून?
किती कलात्मक दिसतात
नाही?!?
रेषेत रेष, षट्कोनात षट्कोन
एका छोट्याश्या कोपऱ्यापासून सुरुवात होऊन वाढत जातं
ते
आणि मग फसतं
एखादं केविलवाणं पाखरू
तडफडतं त्या जाळीत, त्या
सुंदर कलात्मक जाळीत
जुन्याश्या वाड्यात वाटतील हो ती कोळिष्टक कलात्मक,
निसर्गाची
किमया वगैरे बोलू आपण
त्यांना बरचं काही
पण आपल्या २bhk
च्या चकचकीत पांढऱ्या भिंतींच्या कोपऱ्यात वाटतात का तुम्हाला ती
कोळिष्टक कलात्मक?!?
एका झाडूच्या फटक्यात
पुसली जाते सर्व कला,
व्हॅक्युम क्लिनर तर गिळूनच टाकतो
षट्कोनातले षट्कोन
पण मनातल्या कोळिष्टकांचे
काय बरे करावे? नाकातून
कानातून जाईल का ओ
व्हॅक्युम क्लिनरची तोटी?
काय ते MRI, CT SCAN
त्यांने नाही का कळणार
ह्या कलात्मक कोळिष्टकांचे एक्झॅक्ट लोकेशन?!?
अंधार आहे ओ खूप
जणू एखादा धुळकट जुना वाडा
मेंदूभर कोळी फिरत आहेत
बांधत आहेत कोळिष्टक सर्वत्र
एका छोट्याश्या कोपऱ्या
पासून सुरुवात होऊन वाढत गेली
त्यांची कलात्मकता
रेषेत रेष षट्कोनात षट्कोन
फसलंय एक केविलवाणं पाखरू
तडफडतय त्या कलात्मक जाळीत
अंधारात चाचपडताना एकदा कविता सापडली
... जोश्यांची नाही हो आपली
सर्वांची कविता
दिमाग कि बत्ती जली
झाडूच कि हो ही
फिरवली आडवी उभी जेवढे
कोळी तेवढ्या कविता
कलात्मकता versus कलात्मकता
पाखरू जरा मोकळं झालं
श्वास पुन्हा घेऊ लागलं
पण कोळीच ते
येत राहिले पुन्हा
रेषेत रेष षट्कोनात षट्कोन
पाखरू आपलं हातपाय मारतय
अंधारात वहीतल्या कवितेने हाक मारली
म्हणाली, “माझा झाडूतुन व्हॅक्युम क्लिनर मध्ये
अपग्रेडेशन करायचं असेल तर जरा
बाहेर काढ
ना मला….मी
तुझ्या कंठातून तुझ्या श्वासाबरोबर जेव्हा बाहेर पडेन,
मोकळी होऊन चार लोकात
जेव्हा मी वावरेन तुझ्याही
केविलवाण्या पंखांना येईल थोडे बळ!
सुटशील त्या षटकोनातून आणि
एकत्र मिळून खात्मा करू आपण त्या
कोळ्यांचा”
कलात्मकता versus अपग्रेडेड कलात्मकता
सुटतंय पाखरू हळूहळू जाळ्यातून .....
शोधा तुम्ही पण
तुमची झाडू करा तिला
सुद्धा व्हॅक्युम क्लिनर मध्ये अपग्रेड ...
No comments:
Post a Comment